Advertisement

'फ़ॉर मोर शॉट्स प्लीज!'च्या दुसऱ्या सिजनचा ट्रेलर प्रदर्शित

Amazon प्राइम व्हिडिओनं 'फोर मोर शॉट्स प्लीज'च्या दुसर्‍या सीझनचा ट्रेलर रिलीज केला आहे.

'फ़ॉर मोर शॉट्स प्लीज!'च्या दुसऱ्या सिजनचा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

चार मुलींच्या मैत्रिची कहाणी म्हणजे 'फोर मोर शॉट्स प्लीज!'. या वेबसिरीजला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. या वेबसिरीजचा दुसरा सिजन प्रदर्शित झाला आहे. १७ एप्रिल २०२० पासून Amazone प्राइम व्हिडिओवर केवळ स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.

सयानी गुप्ता, कीर्ती कुल्हारी, बानी जे, मानवी गगरू, लिसा रे, प्रितिक बब्बर, मिलिंद सोमण आणि इतरांनी अभिनित या वेबसिरीजची निर्मिती प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्स लिमिटेडनं केली आहे. या पर्वाचं दिग्दर्शन नुपूर अस्थाना यांनी केलं आहे.


Amazon प्राइम व्हिडिओनं 'फोर मोर शॉट्स प्लीज'च्या दुसर्‍या सीझनचा ट्रेलर रिलीज केला आहे. २०१९ साली Amazon प्राइम व्हिडिओवर प्रसारित झालेल्या या वेबसिरीजमध्ये चार वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींची कहाणी सांगितली आहे. त्यांच्यातील मैत्री आणि प्रेम यासोबतच त्यांना एक स्त्री म्हणून आयुष्यात कराव्या लागणाऱ्या समस्यांचा सामना यात मांडण्यात आला आहे. समस्यांवर मात करत त्यांनी जीवनात आनंदी राहण्याचा मार्ग कशाप्रकारे निवडला, हेच यातून सांगण्यात आलं आहे.

शोच्या या दुसर्‍या विलक्षण, मजेदार आणि बोल्ड हंगामात इस्तांबूलच्या शहरात या सुंदर मुलीं एकत्र येतील. पुन्हा एकदा एकमेकांच्या आयुष्यातील सुख: दु:ख शेअर करत आपलं आयुष्य जगताना दिसतील.

फॉर मोर शॉट्स प्लीज! हे टायटल साँग रंगिता प्रीतीश नंदी यांनी संगीतबद्ध केलं आहे. प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्स लिमिटेड यांनी निर्मित केलं आहे. तर दुसरा सीझन नूपुर अस्थाना यांनी दिग्दर्शित केला आहे.

'प्लीज मोअर शॉट्स प्लीज!' या वेबसिरीजचा दुसरा सिजन Amazone प्राइम व्हिडिओवर हिंदु, तेलगू आणि तमिळ यासह २०० देशांमध्ये आणि प्रदेशात अनेक भारतीय भाषांमध्ये प्रसारीत होईल. तुम्ही जर अजून या वेबसिरीजचा पहिला भाग पाहिला नसेल तर तो देखील तुम्ही Amazone वर पाहू शकता.



हेही वाचा

‘रामायण’, ‘महाभारता’नंतर 'शक्तिमान' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'या' वाहिन्या प्रेक्षकांना २ महिने मोफत पाहता येणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा