Advertisement

‘रामायण’, ‘महाभारता’नंतर 'शक्तिमान' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लॉकडाउनच्या काळात सरकारनं ‘रामायण’ व ‘महाभारत’ या जुन्या मालिका पुन्हा एकदा टीव्हीवर सुरू केल्या आहेत.

‘रामायण’, ‘महाभारता’नंतर 'शक्तिमान' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

लॉकडाउनच्या काळात सरकारनं ‘रामायण’ व ‘महाभारत’ या जुन्या मालिका पुन्हा एकदा टीव्हीवर सुरू केल्या आहेत. त्यानंतर आता ‘शक्तिमान’सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शक्तिमान’ ही व्यक्तिरेखा ९० च्या दशकात एवढी प्रसिद्ध होती की, ‘शक्तिमान’ ज्या पद्धतीने उडतो अगदी तसंच उडण्याचा प्रयत्न अनेक मुलं करत होती.

शक्तिमानची क्रेझ आजही तितकीच आहे. त्यामुळं ही मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ही मालिका सुरू करण्यात येणार असून, दुपारी १ वाजताच्या सुमारास दुदर्शनवर दाखविण्यात येणार आहे. ‘शक्तिमान’ या मालिकेचे लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वच शक्तिमानचे चाहते होते. 

याआधी ‘रामायण’ पुन्हा एकदा टीव्हीवर दाखवली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी दिली. त्यानंतर २१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान ‘शक्तिमान’ आणि ‘चाणक्य’ या दोन्ही लोकप्रिय मालिका सुद्धा पुन्हा एकदा टीव्हीवर दाखवाव्यात, अशी जोरदार मागणी सोशल मीडियातून करण्यात येत होती.

रामानंद सागर यांच्या रामायण आणि बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत सीरियलनंतर आता सरकारनं ‘चाणक्य’ आणि शक्तीमान’ या दोन मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे येत्या १४ एप्रिलपर्यंत कुणालाही त्यांच्या घरातून बाहेर पडायची परवानगी नाही.



हेही वाचा -

रेल्वेच्या 'या' कर्मचाऱ्यांची होणार थर्मल स्क्रीनिंग चाचणी

लॉकडाऊननंतर लोकल पासला मुदतवाढ?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा