Advertisement

लॉकडाऊननंतर लोकल पासला मुदतवाढ?

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

लॉकडाऊननंतर लोकल पासला मुदतवाढ?
SHARES

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोरोनामुळं मुंबईची लाइफलाइन बंद ठेवण्यात आली आहे. देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून, २१ दिवस ही लोकल बंद ठेण्यात आली आहे. परंतु, लोकलनं प्रवास करणाऱ्या अनेक नियमीत प्रवाशांनी पास काढले आहेत. त्यामुळं लोकल बंद असल्यानं २१ दिवसांचा पास वाया जाणार अशी चिंता मुंबईकरांना सतावत आहे. मात्र, या चिंतेत असणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे प्रशासनाने दिलासा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

लॉकडाऊन काळात मुंबई लोकलसेवा बंद आहे. या दिवसांची भरपाई म्हणून मासिक पासला काही दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं लॉकडाऊननंतर काही काळ आहे, त्याच पासवर प्रवास करणं शक्य होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात रद्द करण्यात आलेल्या मेल-एक्स्प्रेस तिकिटांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उपनगरीय रेल्वेच्या तिकिटांसह मासिक पासवर रेल्वेकडून सबसिडी देण्यात येते. 

अॅपद्वारे पास काढल्यास 'कॅशबॅक'ही मिळतो. उपनगरीय रेल्वेच्या पासचे पैसे परत करण्याबाबत रेल्वेमध्ये कोणतेही धोरण नाही. मात्र, सर्वसामान्यांची गैरसोय लक्षात घेता, 'विशेष प्रकरण' म्हणून काही दिवस पास वाढवून देता येईल. याबाबत बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. २१ दिवस सार्वजनिक वाहतूक विशेषत: मुंबई लोकल पूर्णत: बंद आहे. 

या काळात लोकलचा पास वाया गेल्याची चिंता अनेकांना समाजमाध्यमांवर व्यक्त करत आहे. लॉकडाऊनचे २१ दिवस भरपाई म्हणून काही दिवस पास वाढवून देण्याबाबत रेल्वे मंडळाकडून कोणतीही सूचना आलेली नाही. मात्र विशेष प्रकरण म्हणून पासची मुदतवाढ देता येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.



हेही वाचा -

रेल्वेच्या 'या' कर्मचाऱ्यांची होणार थर्मल स्क्रीनिंग चाचणी

कोरोना बराही होईल, पण ‘या’ महाभयंकर आजाराचं काय?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा