Advertisement

'या' वाहिन्या प्रेक्षकांना २ महिने मोफत पाहता येणार

या वाहिन्या प्रेक्षकांना केबल आणि डीटीएचवर निशुल्क उपलब्ध होणार आहेत.

'या' वाहिन्या प्रेक्षकांना २ महिने मोफत पाहता येणार
SHARES

कोरोनामुळं देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती. लॉकडाऊनमुळं नागरिकांना घबराबाहेर पडण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळं २४ तास घरी राहिल्यानं नागरिक कंटाळू नये यासाठी देखील केंद्र सरकारनं प्रयत्न सुरू केले असून, जुन्या मालिकांचं पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच काही वाहिन्यासुद्धा आता प्रेक्षकांना २ महिने मोफत पाहता येणार आहेत.

करोनामुळे मिळालेल्या सक्तीच्या सुट्टीच्या निमित्तानं स्टार, झी, सोनी आणि कलर्सच्या काही वाहिन्या प्रेक्षकांना दोन महिने मोफत पाहता येणार आहेत. इंडियन ब्रॉडकास्टर्स फेडरेशन (आयबीएफ) तर्फे ‘सोनी पल’, ‘स्टार उत्सव’, ‘झी अनमोल’, आणि ‘कलर्स रिश्ते’ या वाहिन्या प्रेक्षकांना केबल आणि डीटीएचवर निशुल्क उपलब्ध होणार आहेत. 

केंद्र सरकारने नागरिकांना  घरातच थांबण्याचे आवाहन केलं आहे. यामुळं सध्या प्रेक्षकांचा जास्त वेळ टीव्ही तसेच ओटीटीवरील  कार्यक्रम पाहण्यातच जात आहे. यामुळे सर्व ब्रॉडकास्टर्सनी एकत्र येऊन सोनी पल, स्टार उत्सव, झी अनमोल आणि कलर्स रिश्ते या वाहिन्या २ महिने निशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा -

‘रामायण’, ‘महाभारता’नंतर 'शक्तिमान' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लॉकडाऊनमुळं टीव्ही पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा