Advertisement

नसबंदीवर आधारीत 'शुक्राणू'

१९७६ साली भारतात लागू करण्यात आलेल्या नसबंदीवर हा चित्रपट आधारीत आहे.

नसबंदीवर आधारीत 'शुक्राणू'
SHARES

ZEE5 नं आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'शुक्राणू' असं या चित्रपटाचं नाव आहे. १९७६ साली भारतात लागू करण्यात आलेल्या नसबंदीवर हा चित्रपट आधारीत आहे. त्यावेळी नसबंदी एक पर्याय नव्हता तर तो एक आदेश होता. त्या आदेशाचं पालन करण्याची बळजबरी केली जायची. यावरच हा चित्रपट आधारीत आहे.

दिव्येंदु, श्वेता बसु प्रसाद आणि शीतल ठाकुर स्टारर 'शुक्राणू' रिलायन्स एॅंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड द्वारा निर्मित पहिला डिजिटल चित्रपट आहे.  राष्ट्रीय पुरस्कार विजेता बिष्णु देव हलदर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. २०२० म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला ZEE5 वर प्रिमियर पाहता येईल.

'शुक्राणू' या चित्रपटात हिरो त्याच्या आयुष्यातील एका कठीण परिस्थितीशी लढत असतो. या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्याच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होतोच, शिवाय तो मनाची आत्मशांती देखील गमावतो. पण ही सर्व परिस्थितीला कॉमेडी टच देण्यात आला आहे.    

ZEE5 इंडियाच्या प्रोग्रामिंग हेड अपर्णा आचरेकर यांनी सांगितलं की, "शुक्राणू चित्रपट हा मजेशार आहे. चित्रपटात इतके ट्विस्ट आणि टर्न्स आहेत की प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होईल. चित्रपटाची स्क्रिप्ट वाचून दाखवताना आमची टिम हसून लोट-पोट झाली होती. आम्हाला चित्रपट आवडला तर प्रेक्षकांना देखील आवडेल याची खात्री आहे."

दिव्येंदुनं सांगितलं की, "आम्ही चित्रपटाचं शूटिंग केलं आहे. मी इंदर नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. नसबंदीमुळे माझ्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे चित्रपटात मांडलं आहे. ही भूमिका करणं माझासाठी आव्हानात्मक होतं. कारण विषय संवेदनशील आहे पण आम्ही तो मजेशीररीत्या देखील मांडला आहे. बदमान गली नंतर या माझा दुसरा डिजिटल चित्रपट आहे आणि मी यासाठी खूप उत्सुक आहे."  

"नसबंदी हा विषय नवीन आहे. याआधी कुणी यावर चित्रपट नाही बनवला. चित्रपट संवेदनशील असला तरी प्रेक्षकांना आपलं हसू आवरता येणार नाही. विष गंभीर असला तरी आम्ही त्याला मनोरंजनचा तडका दिला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट आवडेल," असं श्वेता बसु प्रसादनं म्हटलं

शुक्राणू चित्रपटाची शूटिंग गेल्या महिन्यात २६ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू झाली. २०२० च्या सुरुवातीलाच याचा प्रिमियर ZEE5 वर होऊ शकतो



हेही वाचा

‘जयेशभाई जोरदार’मधील रणवीर सिंगचा फर्स्ट लुक पाहिलात का?

कर्जमाफीचा आरोप करणाऱ्यानं मागितली रितेशची माफी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा