Advertisement

११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतला अडथळा अखेर दूर

अनिल बोरनारे यांनी मुंबईतील शाळांना तातडीने रक्कम न मिळाल्यास यंदाच्या ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा इशारा २० मार्च रोजी शिक्षण उपसंचालकांना दिला होता. शिक्षण उपसंचालकांनी त्यावर शुक्रवारी लेखी उत्तर देत कार्यवाही सुरू करत असल्याचे सांगितले व बहिष्कार मागे घेण्याबाबत आवाहन केले आहे.

११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतला अडथळा अखेर दूर
SHARES

मुंबईतील शाळांना देय असलेली ११ वी ऑनलाईन प्रक्रियेतील शुल्काची रक्कम आता परत देण्याची कार्यवाही शिक्षण उपसंचालकांनी सुरू केली आहे. मुंबईतील शाळांच्या बँक खात्यांची माहिती देण्याचे आदेश शिक्षण निरीक्षक कार्यालयांना देण्यात आल्याचे शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.


परताव्याची कार्यवाही सुरू

या प्रश्नांबाबत अनिल बोरनारे यांनी मुंबईतील शाळांना तातडीने रक्कम न मिळाल्यास यंदाच्या ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा इशारा २० मार्च रोजी शिक्षण उपसंचालकांना दिला होता. शिक्षण उपसंचालकांनी त्यावर शुक्रवारी लेखी उत्तर देत कार्यवाही सुरू करत असल्याचे सांगितले व बहिष्कार मागे घेण्याबाबत आवाहन केले आहे.


रक्कम परताव्याची तातडीने कार्यवाही सुरू केल्याने आम्ही ऑनलाईन प्रक्रियेवरील बहिष्कार मागे घेत आहोत.

अनिल बोरनारे, मुंबई विभागीय अध्यक्ष, शिक्षक परिषद


पैसे मिळण्यात वर्षभर उशीर

दरवर्षी मुंबई महानगर क्षेत्रात १० वी उत्तीर्ण होऊन हजारो विद्यार्थी ११ वी साठी ऑनलाईन प्रवेश घेतात. त्यांची एकत्रित रक्कम लाखो रुपये होते. त्यातील शाळांचा मेहनताना म्हणून प्रती विद्यार्थी रक्कम प्रवेश प्रक्रिया संपल्यावर मिळणे अपेक्षित असतांनाही वर्ष उलटून गेल्यावरही शाळांना रक्कम वितरित झालेली नव्हती.



हेही वाचा

पेपरफुटीचं खापर फक्त कोचिंग क्लासवर का?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा