Advertisement

10 वी-12 वी चे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा


10 वी-12 वी चे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी फेब्रुवारी- मार्च 2018 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्राकानुसार बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान होणार असून 1 मार्च ते 24 मार्च 2018 ला दहावीची परीक्षा होणार आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तयारी, नियोजन करता यावी यासाठी काही वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक परीक्षेच्या काही महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार यावर्षीही मंडळाच्या संकेतस्थळावर दाहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परिक्षा, तोंडी परिक्षा, श्रेणी आणि अन्य परीक्षांचे वेळापत्रक महाविद्यालयांना, शाळांना देण्यात देण्यात येईल. ते वेळापत्रक अंतीम असेल असे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागात ही परीक्षा घेतली जाते.

छापील वेळापत्रक हेच अंतीम वेळापत्रक असेल. व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये. असे आवाहन मंडळाने विद्यार्थी, पालकांना केले आहे.

सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.


हेही वाचा - 

परीक्षा आल्या आता अभ्यासाला लागा!

शिक्षकांनो घाई करा...


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा