Advertisement

शिक्षकांनो घाई करा...


शिक्षकांनो घाई करा...
SHARES

राज्य सरकारने राज्यभरातील अप्रशिक्षीत शिक्षकांना 'डीएलएड' अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याकरीता १५ सप्टेंबर ही मुदत दिली होती. या मुदतीत वाढ करून सरकारने ती ३० सप्टेंबर अशी केली आहे.

केवळ दहावी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना तसेच बी.एड. किंवा डी.एड. पदवी नसलेल्या शिक्षकांना राष्ट्रीय मुक्त विद्यालयाचा दोन वर्षांचा 'डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन' (डीएलएड) पूर्ण करणे बंधनकारक आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती. मात्र आता शालेय शिक्षण विभागाने मुदत वाढवून ३० सप्टेंबरपर्यंत केली आहे. 

प्राथमिक शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांसाठी हा नियम लागू असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. मात्र या जीआरमध्ये चित्रकला, कला, हस्तकला यांसारख्या विशेष शिक्षकांबद्दल या जीआरमध्ये स्पष्ट उल्लेख केला नसल्यामुळे शेकडो शिक्षक संभ्रमात आहेत.


या आधी होती अशी प्रक्रीया

अप्रशिक्षीत प्राथमिक शिक्षकांना कामाबरोबरच डी.एड. आभ्यासक्रम पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यासाठी वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली होती. त्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०१९ होती. मात्र बालकांचा मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार कायदा लागू झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत सर्व प्रथमिक शिक्षक प्रशिक्षीत असणे आवश्यक होते. संसदेच्या मान्यतेने ही मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढविण्यात आली.



हेही वाचा -

अखेर आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा