Advertisement

अखेर आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा


अखेर आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा
SHARES

अखेर शिक्षण विभागाने राज्य शिक्षक पुरस्काराची घोषणा केली आहे. येत्या २८ सप्टेंबरला सोलापूरमध्ये शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. राज्यभरातील १०७ शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यामध्ये मुंबईतील एकूण ९ शिक्षकांचा समावेश आहे. दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून या पुरस्काराची घोषणा केली जाते. मात्र यावर्षी शिक्षक पुरस्काराची घोषणा थोडी उशीरा करण्यात आली.

राज्यभरातून एकूण १०७ शिक्षकांना हा पुरस्कार दिला जाईल. त्यात ३७ प्राथमिक, ३९ माध्यमिक, १८ आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक, ८ सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, २ विशेष कला क्रीडा शिक्षक, १ अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक, आणि एका गाईड शिक्षकांचा समावेश आहे. १ लाख रोख रक्कम आणि सन्मामपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.


या पुरस्कारामध्ये मुंबईतील ९ शिक्षकांचा समावेश

  1. प्रसाद पांडे
  2. दक्षा गांधी
  3. राजेश बुजड
  4. मनोहर देसाई
  5. स्नेहा चव्हाण
  6. संगीता श्रीवास्तव
  7. चंद्रकांत पाटील
  8. मंगल डोईफोडे

हेही वाचा - 

शिक्षक दिन : मुंबईतील ३ शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा