Advertisement

आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा कधी होणार?


आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा कधी होणार?
SHARES

दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. त्याप्रमाणे यंदाही तो साजरा होणार यात शंका नाही. पण 1 सप्टेंबरचा दिवस उजाडला तरी राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणाच झालेली नाही. त्यामुळे राज्य शासनाला या पुरस्काराचा विसर पडलाय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असते. यापूर्वी हे राज्य पुरस्कार 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला घोषित केले जात होते. परंतु, शिक्षण विभागाने यात बदल केला असून 19 जानेवारी 2015 च्या परिपत्रकानुसार हे पुरस्कार 15 ऑगस्ट रोजी जाहीर केले जातात. मात्र स्वातंत्र्य दिन उलटून 15 दिवस झाले, तरीही अजूनपर्यंत या पुरस्काराची घोषणा शिक्षण विभागाने केलेली नाही.

आदर्श शिक्षक पुरस्कार प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी गेल्या वर्षीपासून या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुरू केली.

शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी शिक्षण विभागाकडे याविषयी पत्र लिहिले आहे. शिक्षकांसाठी हा पुरस्कार म्हणजे एक प्रेरणाच असते. त्यामुळे शिक्षण विभागाने हे पुरस्कार लवकरात लवकर जाहीर करावेत, अशी मागणी अनिल बोरनारे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.


शिक्षक दिन का साजरा केला जातो?

5 सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता. शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या विद्यार्थ्यांनी एकदा त्यांच्याकडे त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली होती. त्यावेळी त्यांनी माझा जन्मदिवस साजरा करण्यापेक्षा तो दिवस 'शिक्षक दिन' म्हणून पाळला जावा, अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.



हेही वाचा - 

निवास शेवाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

नवी डेडलाईन नाहीच, निकाल लवकरच लागतील - विनोद तावडे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा