१२वीच्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीत मिळणार ७ अतिरिक्त गुण

बारावीच्या रसायनशास्त्र (केमेस्ट्री) विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे बारावीच्या केमिस्ट्रीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ७ अतिरिक्त गुण मिळण्याची शक्यता आहे.

SHARE

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या रसायनशास्त्र (केमेस्ट्री) विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे बारावीच्या केमिस्ट्रीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ७ अतिरिक्त गुण मिळण्याची शक्यता आहे. मात्र हे गुण सरसकट दिले जाणार नाही, तर ज्यांनी हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल, त्याच विद्यार्थ्यांना हे गुण देण्यात येणार आहेत.


४ प्रश्न चुकीचे असल्याची भरपाई

प्राथमिक माहितीनुसार, रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील ४ प्रश्न चुकीचे असल्याचं समजत आहे. मात्र, तज्ज्ञ शिक्षकांकडून या प्रश्नपत्रिका तयार करूनही अशा चुका राहतातच कशा? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या चुकीमुळे आता नाईलाजाने का होईना केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना ७ गुण मोफत द्यावे लागणार आहेत.


केमिस्ट्रीच्या पेपरची दुसरी मोठी चूक

बारावीच्या रसायनशास्त्राच्या पेपरसंदर्भात ही दुसरी मोठी गफलत समोर आली आहे. या अगोदर सलग दोन वर्षे बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आल्यामुळे शिक्षण मंडळाची नाचक्की झाली होती.


७ गुण देण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र यावर सेकंड ओपिनियन गरजेचं आहे. याविषयी आम्ही अभ्यासक्रम ज्यांनी सेट केला, त्यांचं मत घेणार आहोत. सर्वांना सरसकट नव्हे, तर ज्या विद्यार्थ्यांनी ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांनाच अतिरिक्त गुण देण्यात येतील. उद्या दुपारपर्यंत याविषयी अंतिम निर्णय होईल.

शकुंतला काळे, अध्यक्षा, राज्य शिक्षण मंडळहेही वाचा

१०वी - १२वीचं टेन्शन आलंय? मग इथे कॉल करा आणि टेन्शन फ्री व्हा!


संबंधित विषय
ताज्या बातम्या