Advertisement

१०वी - १२वीचं टेन्शन आलंय? मग इथे कॉल करा आणि टेन्शन फ्री व्हा!


१०वी - १२वीचं टेन्शन आलंय? मग इथे कॉल करा आणि टेन्शन फ्री व्हा!
SHARES

दहावी, बारावी म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचं वळण. इथं अभ्यास नाही केला, स्वतःला सिद्ध नाही केलं, तर पुढे काहीच नाही अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान ऐकवल्या जातात. या साऱ्यामुळे विद्यार्थी दडपणाखाली, तणावाखाली येतात. त्यामुळेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी मंडळाने राज्यस्तरावर दहा ऑनलाइन समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. हे समुपदेशक सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आहेत.


नकारात्मकतेला दूर सारा!

मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी, मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) लेखी परीक्षा १ ते २४ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा तोंडावर आली असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात भीती दाटून येते. या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी मंडळाने राज्यस्तरावर ऑनलाइन समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.

हे समुपदेशक विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालकांनी समुपदेशकांना परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था किंवा प्रश्नपत्रिकेसंबंधित प्रश्न विचारू नयेत, अशी विनंतीही मंडळाकडून करण्यात आली आहे.


समुपदेशनासाठी क्रमांक

7796863238

7767960804

7066475360

9028274653

8459112133

9152371361

8652102140

9067986872

7796874474

7083400718

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा