अकरावीच्या अर्जांसाठी आता करावी लागणार घाई!

  Mumbai
  अकरावीच्या अर्जांसाठी आता करावी लागणार घाई!
  मुंबई  -  

  अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी उद्या मंगळवारी शेवटचा दिवस असणार आहे. 27 जून दुपारी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील. ज्या विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरावेत, अशी सूचना शिक्षण उपसंचालक विभागाने केले आहे.


  2 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल

  मुंबई शिक्षण उपसंचालक विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवण्यात येत असून आतापर्यंत 2 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. सर्व्हर डाऊन होत असल्याने सुरूवातीच्या टप्प्यातील प्रवेशप्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नव्हता. त्यानंतर सर्व्हर अपडेट करण्यासाठी एक संपूर्ण दिवस मुंबईत ऑनलाईन प्रक्रिया थांबवण्यात आली. दुरूस्तीनंतर प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी एक दिवस वाढवून दिला.


  तर, जबाबदारी पालकांची

  त्यानुसार कोणत्याही विद्यार्थ्यांला 27 जून 5 वाजल्यानंतर ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार नाही. अर्ज दाखल न झाल्यामुळे एखादा विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिला, तर त्याची जबाबदारी शिक्षण मंडळाची नसेल, तर सर्वस्वी जबाबदारी पालकांची असेल, असे शिक्षण उपसंचालकांनी जाहीर केले आहे.  हे देखील वाचा - 

  प्रॉक्सी बहाद्दरांना चाप, कॉलेजमध्ये होणार डिजिटल हजेरी!

  राजर्षी शाहू शिष्यवृत्तीची मर्यादा वाढवली  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.