राजर्षी शाहू शिष्यवृत्तीची मर्यादा वाढवली

  Mumbai
  राजर्षी शाहू शिष्यवृत्तीची मर्यादा वाढवली
  मुंबई  -  

  राजर्षी शाहू शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीचा लाभ आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या (ईबीसी) घटकातील विद्यार्थ्यांनाही घेता येणार आहे. मंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राजर्षी शाहू शिक्षण शुल्क शिष्यवृ्त्तीच्या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता या योजनेचा लाभ वैद्यकीय, व्यवसायिक, कृषी, पशुसंवर्धन या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाही होणार आहे. मात्र, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे.

  ओबीसी गटात समाविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिक्षण शुल्क म्हणून फीची 50 टक्के रक्कम देण्यात येते. आता या शिष्यवृत्तीचा लाभ ईबीसी घटकातील विद्यार्थ्यांनाही घेता येणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अडीच लाख करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता.


  हेही वाचा

  आयआयटी मुंबईच्या वसतिगृह शुल्कात 300 टक्के वाढ


  वैद्यकीय आणि दंतवैद्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कर्ज घेतलेल्या बँकेतील व्याज शासन भरणार, असा निर्णय सरकारने घेतला होता. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीयिकृत अथवा शेड्युल बॅँकेतून कर्ज घेणे आवश्यक आहे. मात्र आता वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ होणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.