Advertisement

अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा अनलॉक

कोरोनामुळं मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा बुधवारपासून अनलॉक झाल्या असून, ५वी ते ८वीचे वर्ग सुरु झाले आहेत.

अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा अनलॉक
SHARES

कोरोनामुळं मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा बुधवारपासून अनलॉक झाल्या असून, ५वी ते ८वीचे वर्ग सुरु झाले आहेत. शाळा पुन्हा सुरु झाल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचं आणि उत्सुकतेचं वातावरण आहे. मागील ९ ते १० महिन्यांपासून या शाळा बंद होत्या. राज्यातील महत्त्वाच्या शहरांत आता शाळेची घंटा वाजली आहे.

पालकांचं संमतीपत्र घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार असून, तशा सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत. तसंच, शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचं बंधन करण्यात आलं आहे. दुसरीकडं शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोव्हिडचं नियम पाळणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, तालुकास्तारावर ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालये तसेच, सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालयात चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. महापालिकेनंही आरोग्य केंद्रांमध्ये सोय केली आहे. मोठ्या संख्येनं शिक्षक असलेल्या शाळांमध्ये आरोग्य कर्मचारी स्वत: भेट देत आहेत.

पुणे 

 • शहरातील शाळा येत्या 1 फेब्रुवारीपासून उघडण्यात येणार आहेत. 
 • शासनाने घालून दिलेल्या अटी आणि नियमांनुसार कोरोनाच्या उपाययोजना करुन शाळा उघडल्या जाणार आहेत. 
 • विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या काळजीस्तव शाळांचं रोजच्या रोज सॅनिटायझिंग तसंच फिजिकल डिस्टन्सिंग इ. नियमांचं पालन केलं जाणार आहे.

नागपूर

 • कोव्हिड काळात बंद असलेल्या शाळा आजपासून सुरु होणार आहे. 
 • नागपूर ग्रामीणमध्ये ५ वी ते ८ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येणार आहे. 
 • तब्बल १० महिन्यानंतर १६६८ शाळांमध्ये वर्ग सुरु होणार आहेत. 
 • नागपूर ग्रामीणमध्ये ५ वी ते ८ पर्यंतचे १ लाख ४८ हजार विद्यार्थी आहेत. 
 • पालकांचं संमतीपत्र घेऊनंच शाळा सुरु होणार आहेत. 
 • शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचे बंधन करण्यात आलं आहे. 
 • शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोव्हिडचे नियम पाळणंही बंधनकारक करण्यात आलं आहे.

रत्नागिरी

 • जिल्ह्यातील ५वी ते आठवी पर्यंतच्या शाळा बुधवारपासून सुरू होणार आहेत. 
 • कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं रत्नागिरीतील शाळा सुरु होत आहेत. 
 • जिल्ह्यातील सर्व माध्यमातील ३२०२ शाळा बुधावरी सुरू झाल्या आहेत. 
 • ५वी ते ८वीपर्यंत शिकणाऱ्या मुलांची संख्या ८० हजारांवर आहे. 
 • शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३ हजार ६९५ शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 
 • शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोव्हिडचे नियम पाळणंही बंधनकारक करण्यात आलं आहे.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा