• आरटीई प्रवेशाची 6 वी सोडत 15 जूनला
SHARE

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जातो. त्याची पुढील म्हणजेच 6वी सोडत 15 जूनला काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी 11 ते 14 जूनदरम्यान अर्ज सादर करायचे आहेत, असे आदेश महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत.


हेही वाचा - 

आरटीईची तिसरी सोडत जाहीर

आरटीई घोटाळ्यात 2 पालिका कर्मचाऱ्यांसह दलाल अटकेत

शाळेच्या मुख्यध्यापिकेनेच केला RTE घोटाळ्याचा पर्दाफाश


आरटीईच्या पाचव्या फेरीनंतरही 2 हजार 798 जागांसाठी प्रवेश निश्चित झाले आहेत. तर 4 हजार 651 जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यातच 2 हजार 714 विद्यार्थी प्रवेश मिळूनही, शाळेत गेलेलेच नाहीत. या आधी 7 हजार 449 जागांसाठी तब्बल 9 हजार 626 प्रवेश अर्ज आले होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या