शाळेच्या मुख्यध्यापिकेनेच केला RTE घोटाळ्याचा पर्दाफाश


शाळेच्या मुख्यध्यापिकेनेच केला RTE घोटाळ्याचा पर्दाफाश
SHARES

अँटॉप हिल - मुंबईच्या अँटॉप हिल येथील सीबीएम शाळेच्या मुख्यधापकांनी त्यांच्यात शाळेत होऊ घातलेल्या आरटीई घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. शाळेच्या मुख्यध्यापिका रिबेका शिंदे यांच्या तक्रारीनुसार अँटॉप हिल पोलिसांनी दोन दलालांसह सहा पालकांना अटक केली आहे. ज्यात पाच महिलांचाही समावेश आहे.

18 मार्चला सायन कोळीवाडा येथील सीबीएम शाळेच्या पहिलीतील प्रवेशाचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने आरटीई अंतर्गत दाखला मिळवण्यासाठीचे अर्ज शाळेत आले. या अर्जांची पडताळणी केली असता यातील काही अर्जांच्या तारखा या सारख्याच असल्याचं शाळेच्या मुख्यध्यापिका शिंदे यांच्या निदर्शनात आले. त्यांनी या अर्जदार पालकांना बोलावलं आणि त्यांच्याकडून अधिक कागदपत्रांची मागणी केली. पण यातील कोणतेही पालक कागदपत्रांची पूर्तता करू शकले नाहीत. आता मात्र रिबेका शिंदे यांचा संशय अधिकच बळावला आणि त्यांनी याचा छडा लावायचा निर्णय घेतला.

याबाबत 'मुंबई लाइव्ह'ने रिबेका यांच्याशी विचारणा केली असता "सुरुवातीला आपण अर्ज दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या जन्माच्या दाखल्यांची शहानिशा करण्यासाठी शिक्षण विभागाकडे गेले असता त्यांनी सहकार्य करण्याऐवजी तुमचं काम हे अॅडमिशन देण्याचं आहे", असं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आल्याचं रिबेका म्हणाल्या. त्यानंतर त्या एफ-उत्तर वॉर्ड ऑफिसच्या आरोग्य विभागाकडे गेल्या. त्यावेळी त्यांनी चांगलं सहकार्य केलं. पालकांनी शाळेत सादर केलेले जन्माचे दाखले आणि वॉर्ड ऑफिसमधील नोंदी या वेगवेगळ्या असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर अँटॉप हिल पोलीस ठाण्यात जाऊन या सगळ्याविरुद्ध तक्रार दाखल केल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका रिबेका शिंदे यांनी दिली.

या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी कामरुथीन शेख (37) आणि युनूस बाजा (42) या दोन दलालांसह इम्रान सय्यद (32), फरझान (29), मुमताज (37), साईन (40), जरीना (37) आणि राबिया (26) नावाच्या पालकांना देखील अटक केली आहे.

विशेष म्हणजे कित्येक पालकांनी आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यात फेरफार केल्याचा संशय आहे. ज्या पालकांनी आरटीई अंतर्गत शाळेत अॅडमिशन मिळण्यासाठी अर्ज केला आहे, ते काही कोटींच्या घरात राहतात. तर यातील काहींच्या घरात सगळ्या सोयी सुविधा असल्याचं देखील समोर आलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा