Advertisement

146 विद्यार्थ्यांपैकी आठच पास


146 विद्यार्थ्यांपैकी आठच पास
SHARES

मुंबई - मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार मुंबई विद्यापिठाशी संलग्न असलेल्या सर्वच महाविद्यालयांना माहीत आहे. विद्यार्थ्यांना तर विद्यापीठाच्या या त्रासिक कारभाराची सवयच झाली आहे. 2 दिवसांपूर्वी मास कम्युनिकेशनच्या रुईया महाविद्यालयातल्या निकीता किटे हीच्या प्रमाणपत्रातील नावात झालेल्या घोळानंतर मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्था (आयडॉल)चा निकाल विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक ठरलाय.

तृतीय वर्ष विज्ञान शाखेच्या पाचव्या सत्राच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेस बसलेल्या 146 विद्यार्थ्यांपैकी अवघे 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे हा निकाल विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक ठरलाय. बीएससी आयटीला फक्त 5 विषय असतात. तरीही सर्वच विषयात अनेकांनी गटांगळ्या खाल्ल्यामुळे विद्यार्थ्यांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे. विद्यापिठाच्या या घोळामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान देखील होणार आहे. पुनर्मूल्यांकणासाठी या विद्यार्थ्यांना 500 रुपये तर फेर परीक्षेसाठी 750 रुपये भरावे लागणार आहेत. सध्या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थ्यांना शून्य ते 4 गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा