Advertisement

गरीबीमुळे शाळा सोडली, आता देत आहेत १०वीची परीक्षा

कौतुकास्पद म्हणजे दत्ता यांनी त्यांच्या बायकोला देखील स्वावलंबी बनवण्यासाठी रात्र शाळेत दाखल केलं आहे. मुंबईतील हे जोडपं सध्या दहावीची परिक्षा देत आहे.

SHARES

शिक्षण हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी घेणारच, हे वाक्य आहे दत्ता कांबळे यांचं. गरीबीमुळे लहानपणी ते शिक्षण घेऊ शकले नाहीत. पण आता जॉब करून दत्ता स्वत: रात्र शाळेत शिकत आहेत. कौतुकास्पद म्हणजे त्यांनी त्यांच्या बायकोला देखील स्वावलंबी बनवण्यासाठी रात्र शाळेत दाखल केलं आहे. मुंबईतील हे जोडपं सध्या दहावीची परिक्षा देत आहे.   


पती-पत्नी देतायेत १०वीची परीक्षा

दत्ता कांबळे (वय ३२) आणि त्यांची पत्नी कविता साठे (वय २४) दोघंही यंदा दहावीची परीक्षा देणार आहेत. लहान वयात दोघांचंही लग्न झालं होतं. दोघांना एक पाच वर्षाचा मुलगा आहे. दत्ता कांबळे हे ड्रायव्हर म्हणून काम करतात. कांबळेंनी गाडी चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि वयाच्या १८व्या वर्षांपासून गाडी चालवण्यास सुरुवातही केली. अनेक ठिकाणी काम केलं.

पुढच्या महिन्यात म्हणजेच ३ ते २३ मार्चपर्यंत दहावीची परीक्षा होणार आहे. या दोघांनीही वर्षभरापासून दहावी परीक्षेची तयारी केली आहे. मासूम या एनजीओद्वारे चालवण्यात येणाऱ्या रात्रशाळेत जाऊन ते दहावीचा अभ्यास घेत आहेत.

लहानपणापासून मला शिक्षणाची आवड आहे. मी लहान होतो तेव्हा कामासाठी माझे आई-बाबा एका जागेहून दुसऱ्या जागी स्थलांतरीत होत रहायचे. त्यामुळे माझ्या शाळेचा काही अता-पता नसायचा. तरीही एका शेजारी राहमाऱ्या काकूंनी मला शाळेत दाखला मिळवून दिला होता. पण पुढे गरीबीमुळे मला शाळा सोडून काम करावं लागलं. पण तेव्हा अपूर्ण राहिलेलं माझं स्वप्न मी आता पूरेण करत आहे.


दत्ता कांबळे, विद्यार्थी


"शिक्षणाशिवाय पर्याय नाही"

पण आयुष्यभर मजूर म्हणून काम करायचं नाही हे दत्ता कांबळे यांनी ठरवलं. अखेर टिळकनगर इथल्या म..पा शाळेत कृष्णा पाटील यांच्या मदतीनं दत्ता यांनी आठवीसाठी दाखला घेतला. दिवसा काम आणि रात्र शाळेत अभ्यास करून त्यांनी आठवी ते दहावी असा प्रवास केला. आज ते दहावीची परीक्षा देत आहेत.


... म्हणून बायकोचंही अॅडमिशन

विशेष म्हणजे, दत्ता यांनी त्यांच्या पत्नी कविता साठे यांनाही रात्र शाळेतल्या आठवी इयत्तेत दाखला दिला. दत्ता हे ड्रायव्हर म्हणून काम करतात. जर कधी त्यांच्या जिवाचं काही झालं तर त्यांच्या बायको आणि मुलाचं कसं होणार? ही चिंता दत्ता यांना सतावत होती. अखेर त्यांनी आपल्या बायकोला स्वावलंबी बनवण्यासाठी रात्र शाळेत दाखला दिला. जेणेकरून भविष्यात कविता स्वत:च्या पायावर उभी राहू शकेल. कोणाच्या पुढे तिला हात पसरायची गरज नाही. दत्ता यांचे हे विचार खरंच कौतुकास्पद आहेत.    

माझं शिक्षण ७ वी पर्यंत झालं होतं. आम्ही सात बहिणी होतो. पण गरीबीमुळे शिक्षण अर्धवट राहिलं. बाबांना माझं लग्न लावून द्यावं लागलं. पण आता मी पुन्हा शाळेत शिकत आहे याचा मला आनंद आहे. हे सर्व यांच्यामुळे शक्य झालं. यांनी शाळेत दाखला दिला म्हणून शिक्षणाचं महत्त्व मला कळलं.

कविता साठे, विद्यार्थी


मुलाला उच्च शिक्षण देणार

दत्ता आणि कविता यांना ५ वर्षाचा मुलगा आहे. मुलाला खूप शिकवायचं अशी त्यांची इच्छा आहे. शिक्षण नसल्यानं त्यांना जी वागणूक मिळाली ती त्यांच्या मुलाला मिळू नये, अशी इच्छा त्यांनी व्यक्त करून दाखवली. त्यामुळेच ते स्वत: शिक्षण घेत आहेत. जेणेकरून चांगला जॉब करून ते मुलाला देखील चांगलं शिक्षण देऊ शकतील.   


'अशी' चालते रात्र शाळा

टिळकनगर म..पा शाळेत दत्ता आणि कविता यांच्यासारखे अनेक मुलं आहेत जे दिवसा काम आणि रात्र शाळेत शिक्षण घेत आहेत. सहावी ते दहावी इयत्तेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कुणी कचरा वेचून तर कुणी घर काम करून रात्र शाळेत शिक्षण घेत आहेत. मुलांना शाळेत शिकवण्यासाठी खास शिक्षक बाहेरून बोलवले जातात. फक्त सोमवार ते शुक्रनारच नाही तर, शनिवार आणि रविवार या सुट्टच्या दिवशी त्यांचे अधिक क्लास घेतले जातात. दरवर्षी टिळकनगर इथल्या म.न.पा शाळेचा निकाल हा चांगला असतो. मुलांची पास होण्याची टक्केवारी देखील चांगली असते. यावर्षी शाळेत ४० ते ४५ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. 


विद्यार्थांना 'मासूम'चा पाठिंबा

म..पा शाळेसोबतच मासूम या संस्थेचा देखील यात महत्त्वाचा वाट आहे. मासूम या संस्थेच्या मदतीनं हे विद्यार्थी आज आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. विद्यार्थ्यांची परिस्थिती इतकी हालाखिची असते की त्यांच्या पुस्तकं घेण्यासाठी तर सोडा एक वेळच्या खाण्याची देखील मारामारी असते. पण मासूम त्यांच्या शिक्षणाचा खर्च म्हणजे वह्या, पुस्तकं आणि शैक्षणिक वर्षात लागणारं सर्व सामान पुरवते. शिवाय मुलांना एकवेळेचं अल्पोप्रहार पुरवते.

शिक्षण घेण्याची जिद्द असेल तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर कोणीही शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण करू शकतो. याचचं उदाहरण दत्ता आणि कविता यांनी दिलं आहे



हेही वाचा

मेट्रो देणार दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना 'ही' सुविधा

महापालिका शाळांचं होणार नामांतर, 'या' नावानं ओळखल्या जाणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा