Advertisement

मेट्रो देणार दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना 'ही' सुविधा

मेट्रोच्या सर्वच स्थानकांवर (Station) विद्यार्थ्यांसाठी ट्रॅव्हल हेल्पडेस्क (Travel Help desk) उभारले जाणार आहेत.

मेट्रो देणार दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना 'ही' सुविधा
SHARES

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो १च्या (Ghatkoper-varsova metro 1) व्यवस्थापनानं यंदाच्या वर्षी दहावी, बारावी परीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना (Students) एक अनोखी सुविधा दिली आहे. 'मेट्रो १'नं प्रवास करताना गर्दीमुळं परीक्षास्थळापर्यंत (Exam centre) पोहोचण्यास उशीर होऊ नये यासाठी सर्वच स्थानकांवर (Station) विद्यार्थ्यांसाठी ट्रॅव्हल हेल्पडेस्क (Travel Help desk) उभारले जाणार आहेत. या हेल्पडेस्कवर जाऊन विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट दाखवल्यानंतर त्यांना तत्काळ इच्छुक स्थानकाचं तिकीट (Ticket) उपलब्ध करून दिले जाणार आहे.

'मेट्रो १' ही सुविधा १८ फेब्रुवारी ते ३० मार्च या कालावधीत एसएससी (SSC), सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) या तिन्ही मंडळांच्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यांच्याप्रमाणं विद्यार्थ्यांसह पालकांनादेखील ही सवलत देण्यात आली आहे.

या सुविधेसाठी अंधेरी व घाटकोपर या स्थानकांवर स्वतंत्र हेल्पडेस्क कार्यरत राहणार आहेत. तसंच, इतर स्थानकांवर कस्टमर केअरच हेल्पडेस्क म्हणून काम पाहणार आहेत. विद्यार्थ्यांनी हेल्पडेस्कवर हॉल तिकीट दाखवल्यानंतर त्यांना तिकीट उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तसेच, स्वतंत्र सुरक्षा तपासणीद्वारे रांगेविना फलाटावर जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. ही सेवा प्रामुख्यानं वर्सोवा, आझाद नगर, अंधेरी, चकाला-जेबी नगर, मरोळ नाका व घाटकोपर या स्थानकांवर असणार आहेत.



हेही वाचा -

मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी २ एसी लोकल दाखल

रवींद्र वायकर यांना मंत्रिपदाचा दर्जा, दिली ‘ही’ नवी जबाबदारी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा