Advertisement

रवींद्र वायकर यांना मंत्रिपदाचा दर्जा, दिली ‘ही’ नवी जबाबदारी

शिवसेना आमदार रवींद्र वायकर (Shiv sena mla ravindra waikar) यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक (cmo chief co ordnator) म्हणून करण्यात आली आहे.

रवींद्र वायकर यांना मंत्रिपदाचा दर्जा, दिली ‘ही’ नवी जबाबदारी
SHARES

शिवसेना आमदार रवींद्र वायकर (Shiv sena mla ravindra waikar) यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक (cmo chief co ordnator) म्हणून करण्यात आली आहे. या नियुक्तीअंतर्गत त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देखील देण्यात आला आहे.

हेही वाचा- राज ठाकरेंना सिरियसली घेण्याची गरज नाही, शरद पवारांचा टोमणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना मंत्रालयात भेटण्याकरीता संपूर्ण राज्यातून मोठया प्रमाणावर नागरिक निवेदने, तकारी, गाऱ्हाणी घेवून येत असतात. अशा भेटण्याकरीता येणाऱ्या सर्व नागरिकांची निवेदने, तक्रारी व गाऱ्हाणी समजावून घेवून मार्गी लावण्याकरिता मुख्यमंत्री सचिवालयात ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तीची आवश्यकता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं. 

जिल्हास्तरावर व विभाग स्तरावर लोकांच्या तक्रारी प्राप्त करून घेण्याकरीता विभागीय मुख्यमंत्री सचिवालय सुरू करण्यात आलं आहे. त्याची व्याप्ती जिल्ह्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या सर्व कार्यालयांच्या समन्वयासाठी देखील प्रशासकीय अनुभव असणारे रवींद्र वायकर (Shiv sena mla ravindra waikar) काम पाहतील.

हेही वाचा- देशद्रोही भाजपला दिल्लीकरांनी नाकारलं- नवाब मलिक

रवींद्र वायकर (ravindra waikar) यांना कामकाजासाठी आवश्यक सुविधा तसंच मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्य कक्षातील अधिकारी- कर्मचारी  देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने (cmo) दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा