Advertisement

तांत्रिक कारणामुळे आयडॉलच्या परीक्षेस मुकलात? आता 'या' तारखेला होणार पुर्नपरीक्षा

दिलासादायक म्हणजे आयडॉलच्या परीक्षेला जे विद्यार्थी मुकले त्यांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत.

तांत्रिक कारणामुळे आयडॉलच्या परीक्षेस मुकलात? आता 'या' तारखेला होणार पुर्नपरीक्षा
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. पण पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गोंधळाचा सामना करावा लागला. तांत्रिक कारणामुळे आयडॉलच्या साधारण अडीच हजार विद्यार्थ्यांना शनिवारी परीक्षेला मुकावे लागले. या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे.

आयडॉलची अंतिम वर्षांची परीक्षा शनिवारपासून सुरू झाली. संकेतस्थळाचा लॉग-इन आयडी आणि पासवर्ड परीक्षेच्या किमान २४ तास आधी विद्यार्थ्यांना पाठवणं आवश्यक असतानाही शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना ही माहिती पाठविली गेली नाही. ज्या विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळाला नाही त्यांना तांत्रिक अडचणींमुळे शनिवारी परीक्षा देता आली नाही.

पण दिलासादायक म्हणजे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. शनिवारी परीक्षा न देऊ शकलेल्या तृतीय वर्ष बीकॉमच्या विद्यार्थ्यांना ९ ऑक्टोबर, तर तृतीय वर्ष बीएच्या विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबर रोजी पुन्हा संधी दिली जाणार आहे.

पहिल्या दिवशी बीए, बीकॉम, बीएसस्सी आयटी, बीएसस्सी कम्प्युटर अशा चार अभ्यासक्रमांच्या परीक्षा होत्या. या परीक्षांसाठी साधारण साडेआठ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मदतकक्षाशी संपर्क साधला असता उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी कालिना संकुल गाठल्याने काही काळ विद्यापीठाच्या परिसरात गोंधळाचे वातावरण होते.

कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सरकारनं यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे परीक्षा घेण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढवावी अशी विनंती केली होती कारण राज्य त्यासाठी तयार नव्हता.

तथापि, या वर्षाच्या पेपर पॅटर्नमध्ये एमसीक्यू आधारित ऑनलाइन परीक्षांचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त, एक तासाचा ५० मार्कचा पेपर असल्याचंही सांगितलं जातं. व्यावहारिक परीक्षा आणि वायवा या परीक्षा देखील ऑनलाईन घेतल्या जातील. हे एकतर फोन कॉलद्वारे किंवा कोणत्याही उपलब्ध डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे परीक्षा घेतली जाईल.

दुसरीकडे, आधीच्या परीक्षा आणि अंतर्गत मूल्यांकनांच्या आधारे अधिकाऱ्यांनी यापूर्वी इतर वर्षांतील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याचं ठरवलं होतं. तथापि, आयडीओएल विद्यार्थ्यांसाठी हे स्वरूप शक्य नव्हतं, म्हणूनच प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्याचं अधिकाऱ्यांनी ठरवलं होतं.



हेही वाचा

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे 'या' ५ विद्यापीठातील परीक्षा पुढे ढकलल्या

दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा