Advertisement

शिक्षक साजरी करणार काळी दिवाळी


शिक्षक साजरी करणार काळी दिवाळी
SHARES

शाळांना अनुदानापासून वंचित ठेवल्यामुळे राज्यात महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे राज्यभर काळी दिवाळी साजरी केली जाणार आहे. यासाठी येत्या मंगळवारी राज्यभर जिल्हा शिक्षण अधिकारी तसंच विभागीय उपसंचालक कार्यालयाबाहेर ही काळी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.


शासकीय बंगल्यात होणार दिवाळी

त्याशिवाय विनाअनुदानित शिक्षक बंधू-भगिनींना शिक्षणमंत्री यांनी भाऊबीज भेट देण्याचं घोषित केल्यानं ती स्वीकारण्यासाठी मुंबईमधील विनाअनुदानित शिक्षक मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या शासकीय सेवासदन बंगल्यामध्ये दिवाळी साजरी करायला जाणार असल्याचं मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितलं.


'या' मागणीसाठी 'हे' आंदोलन

सर्व घोषित, अघोषित मराठी तसंच प्रादेशिक भाषेतील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना १९ सप्टेंबर २०१६ चा जाचक जीआर रद्द करून १०० टक्के अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे. हा प्रश्न शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सोडवल्यास त्याचा लाभ राज्यातील ५५०० शाळा आणि सुमारे ८५ हजार शिक्षक व त्यांच्या कुटुंबांना होणार असून ही फार मोठी शैक्षणिक क्रांती ठरेल, असं मत रेडीज यांनी व्यक्त केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा