Advertisement

राज्याच्या विविध विद्यापीठांतील परीक्षा ऑफलाइनच होणार'

कोरोना काळात विद्यार्थ्यांची शिकवणी ऑनलाइन झाल्यानंतर आता परीक्षा देखील ऑनलाइनच घ्या अशी मागणी विद्यार्थी वर्गाकडून करण्यात आली होती.

राज्याच्या विविध विद्यापीठांतील परीक्षा ऑफलाइनच होणार'
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन (Mumbai University Offline Exam) माध्यमातून घेण्याचा निर्णय झाला होता. आता राज्याच्या विविध विद्यापीठांतील परीक्षा ऑफलाइनच (University Offline Exam) माध्यमातून होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday samant) यांनी राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक घेतली. त्यामध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

परीक्षा घेताना विध्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे. दोन पेपर मध्ये २ दिवसाचे अंतर असणार आहे. तसंच परीक्षा मे मध्ये न घेता १ जून ते १५ जुलैपर्यंत होतील यावर कुलगुरुंसोबतच्या बैठकीत निर्णय झाल्याचे उदय सामंत म्हणाले.

कोरोना काळात विद्यार्थ्यांची शिकवणी ऑनलाइन झाल्यानंतर आता परीक्षा देखील ऑनलाइनच घ्या अशी मागणी विद्यार्थी वर्गाकडून करण्यात आली होती. पण आता कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर राज्यसरकारने नियम शिथिल केले आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील परीक्षा ऑफलाइन माध्यमातून होतील असे उदय सामंत यांनी जाहीर केले होते.



हेही वाचा

आयसीएसई बोर्ड परीक्षेसाठी कोरोना लस सक्ती नाही, विद्यार्थ्यांना दिलासा

कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिलासा! ऑफलाईन परीक्षेसाठी १५ मिनिटांचा अतिरीक्त वेळ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा