Advertisement

कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिलासा! ऑफलाईन परीक्षेसाठी १५ मिनिटांचा अतिरीक्त वेळ

कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिलासा! ऑफलाईन परीक्षेसाठी १५ मिनिटांचा अतिरीक्त वेळ
SHARES

कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी (College Students) दिलासादायक बातमी (News)आहे. ऑफलाईन परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रती तास १५ मिनिटं वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा जास्तीचा वेळ फक्त उन्हाळी (मार्च/ एप्रिल) २०२२ या परीक्षेपुरता असणार आहे.

आज झालेल्या कुलगुरुंच्या बैठकीत ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास १५ मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर मुंबई विद्यापीठानं शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये होणाऱ्या ऑफलाईन प्रथम सत्र उन्हाळी परीक्षेसाठी वेळ वाढवण्यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर विद्यार्थ्यांची ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे.



हेही वाचा

महाराष्ट्रातील शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी

लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेज, विद्यापिठात जाण्याची परवानगी : उदय सामंत

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा