राज्य सरकारनं शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातील शाळांना उन्हाळी सुट्ट्या २ मे पासून लागू होणार आहेत. यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. १३ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.
सन २०२२ च्या उन्हाळी सुट्टीबाबत शासन स्तरावरून निर्णय घेऊन येत्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबतचा विषय विचाराधीन होता. त्याअंतर्गत शासनानं यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. या निर्णयानुसार सोमवार २ मे २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे.
२०२२-२३ मध्ये, पुढील शैक्षणिक वर्षातील दुसरा सोमवार १२ जून २०२२ पर्यंत या सुट्ट्या लागू असतील. त्यानंतर १३ जून २०२२ पासून शाळा सुरू होतील. तसंच, जून महिन्यातील विदर्भातील तापमान पाहता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर चौथ्या सोमवारपासून म्हणजेच २७ जून २०२२ पासून सुरू होणार आहे.
इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचे निकाल ३० एप्रिल २०२२ रोजी किंवा त्यानंतर सुट्टीच्या काळात जाहीर होऊ शकतात. मात्र, विद्यार्थ्यांना किंवा पालकांना निकालाची माहिती देण्याची जबाबदारी संबंधित शाळेची आहे.
पण, माध्यमिक शाळा संहितेनुसार, शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्यांची संख्या ७६ दिवसांपेक्षा जास्त राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
पुढील शैक्षणिक वर्षापासून, राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये जून महिन्याचा दुसरा सोमवार (सार्वजनिक सुट्टी असल्यास) आणि विदर्भातील तापमान पाहता जूनचा चौथा सोमवार (त्या दिवसानंतर जर तो दिवस असेल तर) शाळा सुरू केल्या जातील, असं परिपत्रकात म्हटलं आहे.
हेही वाचा