Advertisement

शाळा सुरु झाल्यावरही ऑनलाईन लर्निंग सुरू ठेवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

कोरोनाचं संकट टळल्यानंतर जेव्हा शाळा पूर्वीप्रमाणे सुरू होतील, तेव्हा या आॅनलाईन लर्निंगला किती महत्त्व दिलं जाईल, यासंदर्भात ब्रेनलीने एक सर्वेक्षण घेतलं.

शाळा सुरु झाल्यावरही ऑनलाईन लर्निंग सुरू ठेवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल
SHARES

काेरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. अशा स्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी आॅनलाईन शिक्षणावर सरकारचा भर आहे. त्यासाठी उपाययोजनाही केल्या जात आहे. परंतु कोरोनाचं संकट टळल्यानंतर जेव्हा शाळा पूर्वीप्रमाणे सुरू होतील, तेव्हा या आॅनलाईन लर्निंगला किती महत्त्व दिलं जाईल, यासंदर्भात ब्रेनलीने एक सर्वेक्षण घेतलं. या सर्वेक्षणात बहुतांश विद्यार्थ्यांनी आॅनलाईन लर्निंग सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं.

ब्रेनलीद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांनी त्यांना शाळेसोबतच ऑनलाईन लर्निंग सुरु ठेवण्यास आवडेल असं सांगितले. ऑनलाईन लर्निंग व्यासपीठ असलेल्या ब्रेनलीद्वारे देशभरातील २६०० विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं या सर्वेक्षणातून ऑनलाईन लर्निंगलाही विद्यार्थ्यांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचं निदर्शनास आलं.

हेही वाचा- अखेर शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू, मार्गदर्शक तत्वे लवकरच

कोरोना महामारीबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आजही भीती आहे. म्हणूनच शाळा सुरु होण्याबाबत विद्यार्थ्यांचा संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. केवळ ३८.७ टक्के विद्यार्थीच लॉकडाऊन संपताच शाळेत जाण्याच्या मनःस्थितीत असून ३४% विद्यार्थी गोंधळात असल्याचं दिसून आलं.

ब्रेनलीच्या बहुतांश यूझर्सनी (५५.२ %) लॉकडाऊनच्या काळात व्हर्चुअल क्लासेसचा आनंद घेतल्याचं म्हटलं. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यापैकी एक तृतीयांश विद्यार्थ्यांनी म्हटलं की, यापुढेही ते ऑनलाइन लर्निंग सुरू ठेवतील. ४२.५ % विद्यार्थी म्हणाले की, शाळा सुरू झाल्यानंतरही ते ऑनलाईन शिक्षण सुरूच ठेवतील. तर २८.७% पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी याबाबत ते निर्णय घेऊ शकत नसून ऑनलाईन लर्निंग हा अजूनही पर्याय असल्याचं म्हटलं आहे.

शिकवण्याची पद्धत, प्रामुख्याने एकाच क्लिकवर बहुविध रिसोर्स सहजपणे उपलब्ध असल्याने ऑनलाईन मंच हे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियता मिळवत आहेत. सुरक्षित आणि सोशल डिस्टन्सिंग आधारीत इकोसिस्टिमच्या गरजेतून हे परिवर्तन घडत आहे. विद्यार्थ्यी आणि त्यांच्या पालकांसाठी ऑनलाइन लर्निंग हे वेगाने विकसित होणारं सहज उपलब्ध होणारं आणि शिक्षणाचा विश्वासार्ह स्रोत बनत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा