Advertisement

शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव पुन्हा फेटाळला

मुंबई महापालिकेच्या बंद झालेल्या ३५ शाळा खासगी संस्थांच्या माध्यमातून सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण समितीने फेटाळून लावला आहे. प्रशासनाने सादर केलेल्या या सुधारीत धोरणामध्ये शिक्षण समिती अध्यक्षांसह महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांचा समावेश करावा, अशी सूचना करत करण्यात आली आहे.

शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव पुन्हा फेटाळला
SHARES

मुंबई महापालिकेच्या बंद झालेल्या ३५ शाळा खासगी संस्थांच्या माध्यमातून सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण समितीने फेटाळून लावला आहे. प्रशासनाने सादर केलेल्या या सुधारीत धोरणामध्ये शिक्षण समिती अध्यक्षांसह महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांचा समावेश करावा, अशी सूचना करत करण्यात आली आहे.

आधीही फेटाळला होता प्रस्ताव

महापालिकेच्या शाळांमधील मुलांची संख्या कमी झाल्यामुळे तब्बल ३५ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या शाळा सार्वजनिक लोक सहभाग कार्यक्रमांतर्गत खासगी संस्थांच्या शिक्षकांसह संपूर्ण शालेय व्यवस्थापन खासगी संस्थांना चालवण्यास देण्याचा प्रस्ताव २१ नोव्हेंबर रोजीच्या शिक्षण समितीच्या बैठकीत पहिल्यांदा फेरविचारासाठी परत पाठवला होता. हा प्रस्ताव फेटाळून लावतानाच निवड समितीचे अध्यक्ष म्हणून शिक्षण समिती अध्यक्ष यांचा समावेश करावा, तसेच नगरसेवक, आमदार आणि खासदारांच्या शिफारशीनुसार प्रवेश देण्यासाठी २५ टक्के कोटा राखीव ठेवण्याची सूचना केली होती.

सुधारित प्रस्तावही फेटाळला

शिक्षण समितीच्या या शिफारशीनुसार खासगी संस्थांची निवड करणाऱ्या समितीमध्ये शिक्षण समिती अध्यक्षांचा समावेश करतानाच या संस्थांच्या माध्यमातून सुरु होणाऱ्या शाळामधील प्रवेशासाठी खासदार,आमदार आणि नगरसेवकांकरता १० टक्के राखीव कोटा ठेवण्याची सुधारणा यामध्ये करण्यात आली होती.

प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे आदेश

शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी हा प्रस्ताव अर्धवट असून यामध्ये शिक्षण समिती अध्यक्षांसह महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांचाही समावेश केला जावा. तसेच, स्थानिक नगरसेवकांचाही यात समावेश असावा, अशी सूचना केली. त्यामुळे सदस्यांच्या मागणीनुसार स्वच्छ आणि चांगला प्रस्ताव पुन्हा बनवून सादर केला जावा, असे आदेश यावेळी देण्यात आले.

हेही वाचा

महापालिकेच्या शाळांमधील २० शिक्षक निलंबित

महापालिका शाळांमधील मुलींना आता ५ हजारांची मुदतठेव

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा