Advertisement

अश्लिल व्हिडीओ शिक्षकांच्या ग्रुपवर टाकणारा शिक्षक निलंबित

अश्लिल व्हिडीओ (Porn Video) व्हाॅट्सअप ग्रुप (Whatsapp group) वर टाकणाऱ्या एका शिक्षकाला (teacher) मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) निलंबित केलं आहे.

अश्लिल व्हिडीओ शिक्षकांच्या ग्रुपवर टाकणारा शिक्षक निलंबित
SHARES

अश्लिल व्हिडीओ (Porn Video) व्हाॅट्सअप ग्रुप (Whatsapp group) वर टाकणाऱ्या एका शिक्षकाला (teacher) मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) निलंबित केलं आहे. या शिक्षकाने रामदेव बाबा (Ramdev Baba) प्रमाणे छोटसं धोतर नेसून योगासन (Yoga) केलेला व्हिडीओ (Video) शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर टाकला होता. या ग्रुपवर महिला शिक्षिकाही आहेत. त्यांनी या व्हिडीओवर आक्षेप घेतला. या दखल घेत पालिकेने या शिक्षकाला निलंबित (Suspended) केलं. 

हा शिक्षक अनेक अश्लील व्हिडिओ (Porn Video) शिक्षकांच्या (teacher) या ग्रुपवर टाकत असे. ग्रुपमधील सदस्यांनी या शिक्षकाला असे व्हिडीओ  (Video) न टाकण्यास वारंवार सांगितलं होतं. मात्र, त्याने अश्लील व्हिडिओ टाकणं थांबवलं नाही. स्वतःचा योगासनाच्या (Yoga) आक्षेपार्ह व्हिडीओ टाकल्यानंतर मात्र शिक्षकांनी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्याकडे तक्रार केली.  सातमकर यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाला या शिक्षकावर कारवाई करण्यास सांगितलं. मात्र,  शिक्षण विभागाने या शिक्षकावर कसलीच कारवाई केली नाही. अखेर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न शिक्षण समिती (Department of Education) मध्ये उपस्थित झाल्यानंतर सातमकरांनी हा विषय शिक्षण समिती सभेत उपस्थित केला. त्यानंतर शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी संबंधित शिक्षकाला चौकशी होईपर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिले.

पालिकेच्या शिक्षण विभागाने (Department of Education) या शिक्षकाला (teacher) आता निलंबित (Suspended) केलं आहे. चौकशी झाल्यानंतर या तक्रारीत तथ्य आढळल्यास या शिक्षकाला नोकरीतून बडतर्फ केलं जाईल, असं अंजली नाईक यांनी सांगितलं आहे. हा शिक्षक निवृत्तीच्या जवळ आला आहे. कदाचित त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा संशय नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात असल्या गोष्टी घडू नये असा संदेश शिक्षकांमध्ये जाण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.


हेही वाचा -

डाॅन मन्या सुर्वे नाना पाटेकर यांचा भाऊ, त्यांनीच सांगितलं

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसच्या सौंदर्य जतनासाठी २०० कोटींचा निधी





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा