Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसच्या सौंदर्य जतनासाठी २०० कोटींचा निधी

मुंबई विद्यापीठाच्या (University of Mumbai) फोर्ट (fort) परिसरातील पुरातन ऐतिहासिक वारशाचे (Ancient historical heritage) सौंदर्य जतन करण्यासाठी राज्य सरकारकडून २०० कोटी रूपयांचा निधी (Funding) दिला जाणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसच्या सौंदर्य जतनासाठी २०० कोटींचा निधी
SHARES

 मुंबई विद्यापीठाच्या (University of Mumbai) फोर्ट (fort) कॅम्पसमधील पुरातन ऐतिहासिक वारशाचे (Ancient historical heritage) सौंदर्य जतन करण्यासाठी राज्य सरकारकडून २०० कोटी रूपयांचा निधी (Funding) दिला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant, Minister of Higher and Technical Education ), खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule), वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, प्रकुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

मुंबई विद्यापीठाला (University of Mumbai) १६० वर्षांचा ऐतहासिक व गौरवशाली वारसा आहे. फोर्ट (fort) परिसरातील इमारत आणि या भागातील पुरातन ऐतिहासिक वारशाचे (Ancient historical heritage) सौंदर्य जतन करून तेथील निसर्गसंपदा वृद्धिंगत करण्यासाठी हा निधी (Funding) टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे.  पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठ इमारत व परिसराला मूळ सौंदर्य बहाल करून तेथे शिकणाऱ्या व भेट देणाऱ्या नागरिकांना आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापिठाला २०० कोटींचा निधी दिला जाणार आहे. 

मुंबई विद्यापीठ (University of Mumbai) आणि एमएमआरडीए (MMRDA) यांच्या समन्वयातून यासंदर्भातील आराखडा तयार केला जाणार आहे. फोर्ट कॅम्पसप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या कालिना (Kalina) येथील इमारतींची सौंदर्यवृद्धी, परिसराची स्वच्छता, वृक्षलागवड, अतिक्रमण निर्मूलन, शैक्षणिक सुविधांचा विकास या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली. विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना डिजिटल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मुंबई विद्यापीठातील प्रश्नांबाबत गेल्या आठवड्यात आढावा बैठकीत घेण्यात आली होती, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant, Minister of Higher and Technical Education ) सांगितले. 


  •  मुंबई विद्यापीठाच्या (University of Mumbai) फोर्ट (fort) कॅम्पसमधील पुरातन ऐतिहासिक वारशाचे (Ancient historical heritage) सौंदर्य जतन करण्यासाठी राज्य सरकारकडून २०० कोटी रूपयांचा निधी (Funding) दिला जाणार आहे.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • फोर्ट (fort) परिसरातील इमारत आणि या भागातील पुरातन ऐतिहासिक वारशाचे (Ancient historical heritage) सौंदर्य जतन करून तेथील निसर्गसंपदा वृद्धिंगत करण्यासाठी हा निधी (Funding) टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे. 
  • मुंबई विद्यापीठ (University of Mumbai) आणि एमएमआरडीए (MMRDA) यांच्या समन्वयातून यासंदर्भातील आराखडा तयार केला जाणार आहे. 



हेही वाचा -

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही

शाळेत संविधानच्या प्रस्तावनेचे वाचन सक्तीचे; ठाकरे सरकारचा आदेश




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा