पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक साहित्य

 Pali Hill
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक साहित्य

मुंबई - महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना एप्रिल-मे महिन्यातच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला. एप्रिल - मे महिन्यापर्यंत खरेदीची प्रक्रिया पूर्ण करून सर्व शाळेत हे साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल, असं स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितलं. पुढील दोन वर्षासाठी शालेय वस्तूंची खरेदी करण्यात येणार आहे. या सर्व प्रस्तांवाना मंजुरी देण्यात आली असून जानेवारी महिन्यात त्याचे कार्यादेश काढण्यात येतील, असंही यशोधर फणसे यांनी स्पष्ट केलं.

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. शिशुवर्गासह पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश, बूट मोजे, कंपास पेटी, प्लास्टीक पट्टी, कलर्स, रायटिंग पेन्सील, खेाडरबर, शालेय दप्तर, पाण्याची बाटली, खाऊचा डबा, वह्यांचा संच, रेनकोट, छत्री आदी वस्तू मिळणार आहेत.   

Loading Comments