शिक्षण समितीचा अजब न्याय

 Pali Hill
शिक्षण समितीचा अजब न्याय

मुंबई – मुंबई महापालिकेची मान्यता असलेल्या 63 विनाअनुदानीत खासगी प्राथमिक शाळा गेल्या पंधरा वर्षांपासून अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. या प्रस्तावासंदर्भात पालिकेच्या शिक्षण समितीची बैठक सोमवारी पार पडली. यामध्ये वडाळ्यातील मधुकर विश्वासराव शिक्षण संस्था संचलित निर्मल विद्यालयाला हे अनुदान मिळाले आहे. ही शाळा शिवसेनेच्या पालिकेतील सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांच्या संस्थेची आहे. मात्र उर्वरित 62 शाळा अजूनही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. राजकीय वरदहस्तामुळे या शाळेला अनुदान देण्यात आल्याचा आरोप केला जात असून शिक्षण समितीच्या या निर्णयाबाबत शिक्षकांकडून नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Loading Comments