विद्यापीठाच्या चर्चगेट कॅम्पसमधील उपहारगृहाची दुरावस्था


विद्यापीठाच्या चर्चगेट कॅम्पसमधील उपहारगृहाची दुरावस्था
SHARES

मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमधील रानडे भवनच्या इमारतीचा स्लॅब कोसळून तीन विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. यामुळे विद्यार्थी अाणि प्राध्यापकांच्या सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर अाला अाहे. विद्यापिठाच्या अनेक इमारतींचीही दुरावस्था झाली असल्याचं दिसून येत अाहे. गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चगेट कॅम्पसमधील उपहारगृहाची डागडुजी करण्यात आली नसून या उपहारगृहाची दुर्दशा झाली आहे.


स्लॅब कोसळला

मुंबई विद्यापीठाचे चर्चगेट व कलिना असे दोन कॅम्पस असून या दोन्ही कॅम्पसची दुरावस्था झाली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून चर्चगेट कॅम्पसमधील उपहारगृहाची डागडुजी झालेली नाही. गेल्या आठवड्यात अचानक या उपहारगृहाचा स्लॅब कोसळला. सुदैवानं यात कोणतीही जिवितहानी झाली नसली, तरी उपहारगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोळ्याला इजा झाली.


छताचं सिमेंट निघालं

विद्यापीठाच्या चर्चगेट कॅम्पसमध्ये एकमेव उपहारगृह असून या उपहारगृहात अनेक विद्यार्थी येत असतात. या उपहारगृहाच्या छताचं सिमेंट निघालं आहे. यामुळं आतील लोखंडी सळ्याही स्पष्ट दिसत अाहेत. तर उपहारगृहाच्या लाद्याही उखडल्या अाहेत. विद्यार्थी खात असताना वरून कधीकधी अचानक सिमेंटचा स्लॅब कोसळतो. त्यामुळं अनेक विद्यार्थी या उपहारगृहात जाणं टाळतात. 


वर्गांचीही दुर्दशा 

चर्चगेट कॅम्पसमधील अनेक वर्गांचीही दुर्दशा झाली असून अनेक ठिकाणी खुर्च्या मोडकळीस आल्या आहेत. तसंच अनेक ठिकाणी लाद्याही निघाल्या असून, आजूबाजूला असणारे प्लायवूडही निघालं आहे. अनेक वर्गात पंखे, लाईट्सही सुरू नाहीत. करावा लागत आहेत. याशिवाय कॅम्पसमधील वस्तीगृहातही अनेक समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत.विद्यापीठाच्या उपहारगृहात अाता आम्हाला बसण्याचीही भिती वाटू लागली आहे. कित्येक वेळा  वरून सिमेंट पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याशिवाय अनेक वर्गाचीही अवस्था वाईट झाली अाहे.जास्त वजनाचा व्यक्ती या खुर्च्यांवर बसूच शकत नाही. त्यामुळं विद्यापीठानं यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात. 

- विशाल साळवी, विद्यार्थी 


वाईट अवस्थेततही हे उपहारगृह सुरू आहे. विद्यापीठ प्रशासनाने या दुरवस्थेबाबत लवकरात लवकर पाऊल उचलावं. विद्यापीठाकडे पैसे नाहीत हे कारण देण्यापेक्षा विद्यापीठाचे रखडलेले पैसे लवकर कसे मिळतील व तो पैसा सकारात्मक कामात कसा लावता येईल याकडं प्रशासनानं लक्ष देणं गरजेच आहे. 

- सुप्रिया कारंडे, सिनेट सदस्याहेही वाचा - 

नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स येणार मुंबई विद्यापीठात

मुंबई विद्यापीठाचा स्लॅब कोसळला, ३ विद्यार्थीनी जखमी
संबंधित विषय