Advertisement

नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स येणार मुंबई विद्यापीठात

सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स यांना १९९३ साली शरीर विज्ञानशास्त्र (Physiology) किंवा औषधशास्त्र (Medicine) या विषयातील विभाजित जीन्स (Split genes) च्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळालं अाहे. सध्या सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स अमेरिकेतील न्यु इंग्लंड बायो लॅबमध्ये मुख्य विज्ञान अधिकारी म्हणून काम करत अाहेत.

नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स येणार मुंबई विद्यापीठात
SHARES

मुंबई विद्यापीठाचा २०१८ वर्षाचा दीक्षांत समारंभ ११ जानेवारी रोजी संपन्न होणार असून या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स उपस्थित राहणार आहेत. तसंच या दीक्षांत समारंभाला अध्यक्ष म्हणून राज्यपाल सी. विद्यासागर राव उपस्थित राहणार असून सन्माननीय अतिथी म्हणून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे व शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर उपस्थित राहणार आहेत.


विभाजित जीन्सच्या शोधासाठी नोबेल 

 सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स यांना १९९३ साली शरीर विज्ञानशास्त्र (Physiology) किंवा औषधशास्त्र (Medicine) या विषयातील विभाजित जीन्स (Split genes) च्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळालं अाहे. सध्या सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स अमेरिकेतील न्यु इंग्लंड बायो लॅबमध्ये मुख्य विज्ञान अधिकारी म्हणून काम करत अाहेत.  त्यांना उप्पसाला विद्यापीठ, बाथ विद्यापीठ, शेफील्ड विद्यापीठ, डर्बी विद्यापीठ, हाँगकाँगमधील चायनीज विद्यापीठ, अथेन्स विद्यापीठ व लिस्बन अशा विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स व डॉक्टर ऑफ मेडिसीन ही पदवी प्रदान केली आहे.


अनेक विद्यापीठांकडून गौरव

 विशेष म्हणजे फोर्थ मिलिटरी मेडीकल विद्यापीठ, झियान, चायनीज विद्यापीठ हाँगकाँग, नानकाई विद्यापीठ, अस्टाना मेडीकल विद्यापीठ, कझाकस्तान, डालियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल फिजिक्स, युरेशियन इकोनॉमिक क्लब ऑफ सायन्टीस्ट्स, वुहान विद्यापीठ, चीन, झियांग-नान या विद्यापीठांनी त्यांना प्राध्यापक ही पदवी बहाल केली आहे. 


११ आंतरराष्ट्रीय पेटंट्स

सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स यांचा जन्म १९४३ साली इंग्लंडमधील डर्बी येथे झाला असून त्यांनी इंग्लंडमधील शेफील्ड विद्यापीठातून रसायनशास्त्रातून बी.एस्सी.ची पदवी प्राप्त केली असून याच विद्यापीठातून त्यांनी ऑर्गनिक केमिस्ट्रीमधून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स यांचे २४३ संशोधनपर शोधनिबंध आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधन पत्रिकेतून प्रकाशित झाले अाहेत. त्यांनी संशोधन केलेले ११ आंतरराष्ट्रीय पेटंट्स त्यांच्या नावे आहेत. त्याशिवाय ते अनेक वैज्ञानिक संस्थांचे सदस्य व वैज्ञानिक सल्लागार असून त्यांना जगभरातून विविध पुरस्कार मिळाले आहेत.


तयारी चालू

११ जानेवारी रोजी होणाऱ्या दीक्षांत सभारंभाची तयारी पूर्ण होत आली अाहे. ज्या विद्यार्थ्यांचे नियमित व पुनर्मुल्यांकनासह निकाल ११ जानेवारी २०१९ पुर्वी जाहीर झाले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रमाणपत्र त्यांच्या कॉलेजमधील पदवी वितरण समारंभात मिळणार आहेत, असं परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले.


सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स हे नोबेल विजेते प्रमुख अतिथी म्हणून दीक्षांत समारंभाला उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.  अशा प्रज्ञावंतांकडून विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व पुरस्कार मिळणं ही विद्यापीठासाठी एक विशेष पर्वणी असणार आहे.

 - डॉ. सुहास पेडणेकर,  कुलगुरू, मुंबई विद्यापीठ 



हेही वाचा - 

मुंबई विद्यापीठाचा स्लॅब कोसळला, ३ विद्यार्थीनी जखमी

पास होऊन वर्ष उलटलं, तरी निकालाची प्रत मिळेना




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा