मुलुंडमध्ये करिअर फेस्टिवल

 Mulund
मुलुंडमध्ये करिअर फेस्टिवल
मुलुंडमध्ये करिअर फेस्टिवल
See all

मुलुंड - व्ही.जी.वझे महाविद्यालयामध्ये शुक्रवारी 'करियर फेस्टिवल' चा दुसरा आणि शेवटचा दिवस होता. या कार्यक्रमाचे आयोजन व्ही. जी. वझे महाविदयालयानं केलं होतं. तर या आयोजनात 'निर्मल्स ब्राईट वे' यांचा सहभाग होता. गुरुवारच्या भागात विद्यार्थ्यांना करियरचे नवनवीन पर्याय दाखवण्यात आले. तर शुक्रवारी विद्यार्थ्यांना अत्यंत भीतीदायक वाटणाऱ्या 'इंटरव्यू या विषया बद्दल मार्गदर्शन केलं गेलं. इंटरव्यूला जाताना कशा प्रकारे तयारी केली पाहिजे, तुम्ही तुमचा आत्मविश्वास कसा वाढवाल, नक्की काय अभ्यास करून जाल या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात दिली गेली. तसेच एमबीए आयटी मधील तज्ज्ञही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल यात शंकाच नाही. महाविद्यालयानं राबवलेले हे असे उपक्रम खरंच स्तूत्य आहेत.

Loading Comments