Advertisement

CBSE परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) तर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

CBSE परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
SHARES

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) तर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ मार्च २०२० दरम्यान घेण्यात येणार आहे. तसंच, दहावीची परीक्षा २ मार्च ते २८ मार्च २०२० या कालावधीत घेण्यात येणार आहे.

वेबसाईटवर वेळापत्रक

cbse.nic.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून दहावीच्या विद्यार्थ्यांना ते डाऊनलोडही करता येणार आहे. यंदा सीबीएसईची दोन्ही परीक्षा सकाळी १०.३० ते १.३० वाजेपर्यंत होणार आहे. या परीक्षेसाठी सकाळी १० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना हजर राहावं लागणार आहे.

परीक्षेची तयारी

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीला जोरदार सुरूवात केली आहे. दरम्यान, मागील वर्षी बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ३ एप्रिल २०१९ कालावधीत घेण्यात आली होती. तसंच, दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २९ मार्च २०१९ या कालावधीत घेण्यात आली असून, जूनमध्ये निकाल जाहीर करण्यात आले होते.



हेही वाचा -

पिंजरा, सिंहासन फेम 'नटसम्राट' श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड

छीन के लेंगे आझादी… मान्य आहे का? फडणवीसांनी विचारला मुख्यमंत्र्यांना प्रश्न



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा