Advertisement

'नटसम्राट' श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड

वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

'नटसम्राट' श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड
SHARES

ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं ‌वृद्धापकाळानं मंगळवारी निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं कला क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पहिले 'नटसम्राट'

डॉक्टर लागू यांनी १०० पेक्षा अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. ४० पेक्षा अधिक मराठी, हिंदी आणि गुजराती नाटकांमध्ये अभिनय केले. तसंच २० हून जास्त नाटकांचे दिग्दर्शन सुद्धा केलंय. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राटचे नाटक झाले तेव्हा पहिले नटसम्राट तेच होते.

केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी आणि गुजराती चित्रपट, कार्यक्रमांमध्ये त्यांनी अभिनयाची छाप सोडली होती. डॉक्टर म्हणूनही ओळखले जाणारे लागू केवळ अभिनेते किंवा दिग्दर्शकच नव्हे, तर एक विचारवंत आणि समाजसेवक होते.

डॉक्टर ते कलाकार

श्रीराम बाळकृष्ण लागू मेडिकल कॉलेजला जात असतानाच अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली होती. ५० च्या दशकात त्यांनी मुंबई विद्यापीठातून ईएनटी (कान, नाक, घसा) यामध्ये मेडिकलची पदवी मिळवली. पुढील ६ वर्षे पुण्यात प्रॅक्टिस केली. यानंतर त्यांनी कॅनडा आणि इंग्लंडला जाऊन पुढील प्रशिक्षण घेतलं.

सामाजिक क्षेञात पुढाकार

नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात काम करताना श्रीराम लागू यांनी पुरोगामी नाट्य संघटना सुरू केली. समविचारी कलाकारांना सोबत घेऊन आपले विचार पुढे नेले. देवाला रिटायर करा अशी आरोळी करत त्यांनी पुरोगामी आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा