Advertisement

छीन के लेंगे आझादी… मान्य आहे का? फडणवीसांनी विचारला मुख्यमंत्र्यांना प्रश्न


छीन के लेंगे आझादी… मान्य आहे का? फडणवीसांनी विचारला मुख्यमंत्र्यांना प्रश्न
SHARES

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं. विद्यापीठातील कॅम्पसमध्ये गोळीबार करणं हा प्रकार जालियानवालाबागसारखा प्रकार असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यावर विद्यार्थ्यांकडून लावण्यात येणाऱ्या नाऱ्यांनाही तुमचं समर्थन आहे का? असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. 

 हेही वाचा- युवाशक्तीचा बाॅम्ब पेटवू नका, ‘जामिया’वरून केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर ट्विट करताना फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईची जालियानवालाबागशी तुलना केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांचा अपमान असल्याचं फडणवीस यांनी ट्विट केलं. 

  हेही वाचा- ‘या’ तारखेला होणार राज्य मंत्रिमंडळ विस्तार 

शिवाय फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. त्यात उपस्थित विद्यार्थी नारे देताना दिसत आहेत. हम छीन के लेंगे आझादी… अशा नाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं समर्थन आहे का? असा प्रश्न त्यांनी ट्विट करून विचारला आहे.  

या आंदोलनाला शिवसेना ज्या पद्धतीने पाठिंबा देत आहे, त्यावरून शिवसेना व्यक्तिगत फायद्यासाठी कुठल्या स्तराला उतरु शकते, हे कळत असल्याचंही फडणवीस म्हणाले. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा