Advertisement

‘या’ तारखेला होणार राज्य मंत्रिमंडळ विस्तार

नागपूरमधील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशाआधी केवळ ६ मंत्र्यांमध्ये खात्यांचं वाटप करण्यात आलं असलं, तरी लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होण्याची शक्यता आहे.

‘या’ तारखेला होणार राज्य मंत्रिमंडळ विस्तार
SHARES

नागपूरमधील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशाआधी केवळ ६ मंत्र्यांमध्ये खात्यांचं वाटप करण्यात आलं असलं, तरी लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अद्याप ठरलेली नाही. परंतु हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता आहे.

हेही वाचा- सरकार चालवायचं तर एकी गरजेची- अजित पवार

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी २ अशा केवळ ६ नेत्यांनीच मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून टीकेचा सामना करावा लागू नये म्हणून या ६ मंत्र्यांमध्येच ५० हून अधिक खात्यांचं वाटप करण्यात आलं. नागपूर विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन जेमतेम आठवडाभरात संपणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळेल, असं म्हटलं जात आहे. 

हेही वाचा- युवाशक्तीचा बाॅम्ब पेटवू नका, ‘जामिया’वरून केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांचा इशारा

मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची शक्यता असलेले मंत्री गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यातील २३ किंवा २४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा