Advertisement

सरकार चालवायचं तर एकी गरजेची- अजित पवार

सरकार चालवायचं असेल, तर एकी सर्वात महत्त्वाची असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार ​अजित पवार ​​​म्हणाले.

सरकार चालवायचं तर एकी गरजेची- अजित पवार
SHARES

कुठल्याही प्रस्तावावर चर्चा होताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची सभागृहात १०० टक्के उपस्थिती असावी. सरकार चालवायचं असेल, तर एकी सर्वात महत्त्वाची असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार म्हणाले.  

हेही वाचा- युवाशक्तीचा बाॅम्ब पेटवू नका, ‘जामिया’वरून केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांचा इशारा

नागपूरमधील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील आमदारांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी थेट सरपंच, नगराध्यक्ष निवड नको, असं बहुतेक आमदारांनी आपल्याला सांगितल्याची माहिती दिली. बाजारसमितीबाबतही अशीच भूमिका असल्याचं ते म्हणाले.   

राज्य मंत्रिमंडळाने जनतेतून थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याची पद्धत तसंच महापालिकांतील बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यावरील चर्चेत तिन्ही पक्षांतील आमदारांनी सहभागी व्हावं, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.   

हेही वाचा- महापालिकांमधील प्रभाग पद्धत रद्द होणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा