Advertisement

परीक्षा रद्द; तरीही मुंबई विद्यापीठाकडून शुल्क आकारणी

मुंबई विद्यापीठाकडून मात्र पुढील काही परीक्षांसाठी तसेच अंतिम वर्षाच्या काही सत्रांसाठी परीक्षांसाठी नोंदणी शुल्क आकारण्यात येत आहे.

परीक्षा रद्द; तरीही मुंबई विद्यापीठाकडून शुल्क आकारणी
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत अनेक प्रश्न उपरस्थित होत होते. परंतु, या परीक्षा रद्द करण्यात आल्या. राज्यात शासन स्तरावर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा रद्दचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीही मुंबई विद्यापीठाकडून मात्र पुढील काही परीक्षांसाठी तसेच अंतिम वर्षाच्या काही सत्रांसाठी परीक्षांसाठी नोंदणी शुल्क आकारण्यात येत आहे.

परीक्षा रद्द असतानाही मुंबई विद्यापीठ एम. एस. सी. मॅथमॅटिकच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला १४०० आणि आता १७०० असे वाढीव शुल्क भरण्यास संगितल्याची तक्रार एका विद्यार्थ्यानं केली. मुबंई विद्यापीठाच्या १५० विद्यार्थ्यांकडून हे शुल्क भरण्याचा अट्टाहास सुरु असल्याची माहिती विद्यार्थी भारतीच्या अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली.

परीक्षांचा निकाल आणि प्रमाणपत्रे यांच्यासाठी जर विद्यापीठाला पैसे लागणार असतीलच तर त्याचा खर्च ही त्यांनी जाहीर करावा आणि तसे शुल्क आकारण्यात यावं, असंही त्यांनी म्हटलं. तसंच, आमच्या संस्थेने या शैक्षणिक वर्षाची शुल्क रचना कमी करण्याबाबत राज्यपालांना पत्र लिहिले असल्याची माहिती स्टुडण्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊनदरम्यान सर्वच यंत्रणा बंद होत्या. त्याशिवाय, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा व कॉलेज बंद ठेवण्यात आल्या. सध्या राज्यात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी यासाठी ऑनलाईन शिक्षणाला सुरूवात केली आहे.हेही वाचा -

सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं निधन

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक भागांमध्ये साचलं पाणीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा