Advertisement

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक भागांमध्ये साचलं पाणी

मुंबईत पावसानं (Mumbai Rains) दमदार हजेरी लावली आहे. मुंबईतल्या काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक भागांमध्ये साचलं पाणी
SHARES

मुंबईत पावसानं (Mumbai Rains) दमदार हजेरी लावली आहे. मुंबईतल्या काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार हवामान विभागानं (weather Department) मुंबई ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढच्या २४ तासात कोकण, मुंबई काही भागात मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार पावसाला सुरुवात झाली आहे.  

शुक्रवारी सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होतं. दक्षिण मुंबई म्हणजेच कुलाबा ते भायखळा, मध्य मुंबई, दादर, माहिम, चेंबूर परिसरात मुसळधार पाऊस पडतो आहे. तर नवी मुंबई, वाशी, बेलापूर परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. याचा ट्विटरवर अनेकांनी व्हिडिओ शेअर केला आहे.

 

गुजरात आणि लगतच्या अरबी समुद्रातील हवामानातील बदलांमुळे राज्यात सर्वत्र पाऊस हजेरी लावले असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आयएमडीनं मुंबईला आणि किनारपट्टीवर २४ ते ४८ तासासाठी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

राज्याच्या किनारी भागासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस ठिकठिकाणी पावसाच्या मुसळधार कोसळतील असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 3 जुलै आणि 4 जुलै रोजी मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे.

दरम्यान, मुंबईत पावसाची शक्यता पाहता पालिकेनं पावसात काय करावं आणि करू नये याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. हेही वाचा

Mumbai Rains: ४ जुलैपासून मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा