Advertisement

राज्यातील सर्व शाळा डिजिटल होणार - मुख्यमंत्री


राज्यातील सर्व शाळा डिजिटल होणार - मुख्यमंत्री
SHARES

शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानामुळे राज्यातील शाळा डिजिटल करण्यात येत असून, डिसेंबर 2018 पर्यंत राज्यातील सर्व शाळा डिजिटल होतील आणि त्यातून विद्यार्थ्यांना या अभियानांतर्गत आनंददायी, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला.

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील युवा पिढीशी संवाद साधला. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील शाळा डिजिटल करण्यासह विद्यार्थ्यांचा लर्निंग आऊटकम 100 टक्के करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. गेल्या 2 वर्षांतील शैक्षणिक प्रगती पाहता महाराष्ट्राने शिक्षण क्षेत्रात 18 व्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. खाजगी शाळांमधून जवळपास 15 हजार विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिकत आहेत. याचा अर्थ या शाळांमधील शिक्षण आणि प्रयोगशील शिक्षकांचे हे यश आहे. विशेष म्हणजे शहरांपेक्षा ग्रामीण भागात शाळा डिजिटल होत असून, आत्तापर्यंत ग्रामीण भागातील 44 हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचा व्हिडिओही मु्ख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

Sharing link of my interaction and discussion on education with the youth in https://twitter.com/hashtag/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF?src=hash">#मीमुख्यमंत्रीबोलतोय https://t.co/Eqiwvu5mal">https://t.co/Eqiwvu5mal

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) https://twitter.com/Dev_Fadnavis/status/866241687160586241">May 21, 2017

वेगवेगळ्या खाजगी शाळांमध्ये भरमसाठ शैक्षणिक शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत, या तक्रारी दूर करण्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरण काम करीत असून, त्यासाठी नव्याने समिती गठित करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा