Advertisement

कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्या, क्लासचालकांची मागणी

राज्यात मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे वगळता पाचवी ते बारावीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले आहेत. महाविद्यालयेही लवकरच सुरू होणार आहेत.

कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्या, क्लासचालकांची मागणी
SHARES

राज्यात आता जवळपास सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यामुळे कोचिंग क्लासेस सुरू करण्याचीही परवानगी द्यावी, अशी मागणी क्लासचालकांच्या संघटनांनी केली राज्य सरकारकडे केली आहे.  क्लासचालकांनी यासाठी काही नियम स्वतःहून तयार केले आहेत. 

राज्यात मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे वगळता पाचवी ते बारावीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले आहेत. महाविद्यालयेही लवकरच सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोचिंग क्लासेस सुरू करण्यासही परवानगी देण्यात यावी, अशी विनंती कोचिंग क्लास चालकांनी सरकारला केली आहे.

राज्यात पाचवी ते बारावीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. त्याचप्रमाणे आम्हालाही कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी राज्य कोचिंग क्लास ओनर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळानं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना केली आहे. क्लासचालकांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेसाठी तयार केलेली नियमावलीदेखील यावेळी सादर करण्यात आली.

 मार्च महिन्यापासून कोचिंग क्लासेस बंद झाले होते. या काळात विद्यार्थ्यांसह क्लासचालकांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी लाखो रुपये फी भरली होती, मात्र क्लासेस सुरूच होऊ शकले नाहीत. अनेक क्लासचालकांना त्यांच्याकडे असणारा शिक्षक वर्ग कमी करावा लागला. अनेकांना क्लासच्या जागेचे भाडे भरता न आल्यामुळे क्लास बंद करावे लागले आहेत. 



हेही वाचा -

नोकरी पाहिजे? मग 'या' WhatsApp नंबरवर 'Hi' पाठवा

शाळा, महाविद्यालयांच्या मैदानाचा वाहन प्रशिक्षणासाठी होणार वापर?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा