Advertisement

जुलैमध्ये जाहीर होणार १०वी व १२वीचा निकाल?

विद्यार्थी व पालकांना निकालाची प्रतीक्षा लागली असून नुकताच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक दिलासादायक घोषणा केली आहे.

जुलैमध्ये जाहीर होणार १०वी व १२वीचा निकाल?
SHARES

मुंबईसह देशभराच कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण मंडळांनं शाळा व कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मागील अडिच महिन्यांपासून शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान यामुळं १०वी-१२वीच्या परीक्षा आणि त्यांच्या निकालांवर देखील परिणाम झाला आहे. विद्यार्थी व पालकांना निकालाची प्रतीक्षा लागली असून नुकताच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक दिलासादायक घोषणा केली आहे. जुलै महिन्यात निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वर्षा गायकवाड यांनी जुलै महिन्यात या दोन्ही परीक्षांचे निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती दिली. १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागू नये, म्हणून हे निकाल जुलै महिन्यात लावण्याचा आमचा प्रयत्न असेल. कोरोना आणि लॉकडाऊनमुळं यंदा हे निकाल जवळपास महिनाभर उशिरा लागणार आहेत. आमचा प्रयत्न आहे की १२वीचे निकाल १५ जुलैपर्यंत आणि १०वीचे निकाल जुलै अखेरपर्यंत लावले जावेत. जेणेकरून ऑगस्ट महिन्यात पुढच्या वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू करता येईल’, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळं विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जुलै महिन्यात निकाल लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यात कोरोनामुळे देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे, राज्यातील शैक्षणिक क्षेत्रावरही याचा परिणाम झाला. दहावीचा एक पेपर रद्द करण्यात आला असून अंतिम वर्षांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. तर, दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालावर या कोरोना महामारीच्या लॉकडाउनचा परिणाम झाला आहे.

यंदा दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल उशीर लागणार असून विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नुकतेच, जुलै महिन्यापासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यास मान्यता दिली. त्यामुळे, शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



 हेही वाचा -

पावसात अडकल्यास मुंबई पालिकेचं 'हे' अ‍ॅप ठरणार संकटमोचक

मुंबईतील 'या' वॉर्डांमधील कोरोना रूग्णांची संख्या अनेक राज्यांपेक्षा अधिक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा