Advertisement

स्टाफ सिलेक्शन परीक्षांच्या नवीन तारखा ३ मे नंतर ठरणार

कोरोना विषाणूच्या (coronavirus) साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कर्मचारी निवड आयोगाची (staff selection commission) विशेष बैठक नुकतीच घेण्यात आली.

स्टाफ सिलेक्शन परीक्षांच्या नवीन तारखा ३ मे नंतर ठरणार
SHARES

कोरोना विषाणूच्या (coronavirus) साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कर्मचारी निवड आयोगाची (staff selection commission) विशेष बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत परीक्षांच्या नव्या तारखांबाबतचा निर्णय ३ मे, २०२० नंतर म्हणजेच लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपल्यानंतरच घेण्याचं ठरवण्यात आलं.

हेही वाचा - रेल्वेने केली ३९ लाख तिकीटं रद्द

लॉकडाऊनमुळे (lockdown) निर्माण झालेल्या निर्बंधांमुळे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांमुळे, असा निर्णय घेण्यात आला होता की, सगळ्या परीक्षांच्या (new exam date) तारखांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल, ज्यात उमेदवारांना देशाच्या विविध भागांमधून प्रवास करून यावं लागतं. संयुक्त उच्च माध्यमिक (१० + २) परीक्षा (श्रेणी –१), कनिष्ठ अभियंता (पेपर –१) परीक्षा २०१९, स्टेनोग्राफर श्रेणी ‘सी’ आणि ‘डी’ परीक्षा २०१९ आणि संयुक्त उच्च माध्यमिक श्रेणी परीक्षेसाठी कौशल्य चाचणी परीक्षा २०१८ या परीक्षांच्या नव्या तारखांबाबतचा निर्णय ३ मे, २०२० नंतर म्हणजेच लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपल्यानंतर घेतला जाईल.  

या परीक्षांच्या तारखांचे केलेले नियोजन आयोगाच्या वेबसाइटवर आणि आयोगाच्या प्रादेशिक / उपप्रादेशिक कार्यालयांमध्ये अधिसूचित केले जाईल. आयोगाने अधिसूचित केलेल्या परीक्षांच्या वार्षिक वेळापत्रकाच्या बरोबरच अन्य परीक्षांच्या वेळापत्रासंदर्भातही आढावा घेतला जाईल.

हेही वाचा - लाॅकडाऊनमुळे अडकलेल्या ३७०० परदेशी नागरिकांना मायदेशी पाठवलं

तसंच, एसएससीचे (स्टाफ सिलेक्शन कमीशन) सर्व अधिकारी आणि कर्मचारी सदस्य त्यांचा एक दिवसाचा पगार आपत्कालीन परिस्थितीतील पंतप्रधान नागरिक सहायता आणि मदत निधीला (पीएम केअर्स फंड) देतील, असं ठरविण्यात आलं.  


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा