Advertisement

फायनल इयर सोडून काॅलेजांच्या इतर परीक्षा रद्द- उदय सामंत


फायनल इयर सोडून काॅलेजांच्या इतर परीक्षा रद्द- उदय सामंत
SHARES

राज्यातील विद्यापीठ परीक्षांविषयी अंतिम निर्णय शुक्रवार ८ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, अंतिम सोडून अन्य परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. UGC नं दिलेल्या निर्देशांनुसार सगळे निर्णय घेण्यात येत आहेत असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

B.A. हा तीन वर्षांचा कालावधी आहे, त्यात सहा सेमीस्टर असतात. त्यातल्या सहाव्या सेमीस्टरची परीक्षा घेणार. B.COMचंही तसंच असणार आहे, जिथे ८ सेमीस्टर आहेत तिथे आठव्या सेमीस्टर होणार, १० सेमीस्टर असतील तिथे १० व्या सेमीस्टरची परीक्षा घेण्यात येणार आहेत. MA, एमकॉम आणि इतर २ वर्षांचा कोर्स आहेत, चार सेमीस्टर आहेत तिथे चौथ्या सेमीस्टरची परीक्षा होणार आहे. डिप्लोमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. कालावधी सहा सेमिस्टरचा आहे. सहाव्या सेमीस्टरची परीक्षा होईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्गात प्रवेश मिळणार, मात्र नापास झालेले विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा या १ ते ३१ जुलै दरम्यान होणार आहेत. मात्र लॉकडाउनची स्थिती कायम राहिल्यास २० जूनच्या आसपास बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा