Advertisement

CBSE दहावी, बारावी परीक्षेच्या पहिल्या सत्राची डेटशीट जाहीर

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या कधी आहे परिक्षा...

CBSE दहावी, बारावी परीक्षेच्या पहिल्या सत्राची डेटशीट जाहीर
SHARES

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. वेळापत्रकानुसार इयत्ता दहावीची पहिल्या सत्राची परीक्षा ३० नोव्हेंबरपासून सुरू होईल. तर इयत्ता बारावीच्या टर्म पहिल्या परीक्षा एक डिसेंबर पासून सुरू होईल. परीक्षेचं वेळापत्रक www.cbse.gov.in या अधिकृत वेसबाईटवर जाऊन डाऊनलोड करता येईल.

डेटा शीट कशी पाहावी?

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट- cbse.nic.in ला भेट द्या.
  • त्यात Whats New याच्या लिंकवर क्लिक करा.
  • १० वी किंवा १२ वीच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता एक पीडीएफ उघडेल, ते डाऊनलोड करा.

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील थंडीचा विचार करता सीबीएसईकडून परिक्षा सुरू करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नेहमी परीक्षा सकाळी १०.३० वाजता सुरु होत असते. मात्र, थंडीचा विचार करता ही परीक्षा सकाळी ११.३० वाजता सुरु होईल. तर, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यासाठी २० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.

सीबीएसई बोर्डानं म्हटलं आहे की, सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा केवळ ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येतील. टर्म -१ परीक्षेत ५० टक्के अभ्यासक्रमावर आधारित पेपर तयार केले जातील, असं बोर्डानं सांगितलं आहे.

सीबीएसईतर्फे घेण्यात येणारी टर्म वन म्हणजेज पहिल्या सत्राची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात असेल. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत. कोरोना संसर्गाची स्थिती कमी झाल्यास यंदाच्या दोन्ही सत्राच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीन घेतल्या जाणार आहेत.



हेही वाचा

२० ऑक्टोबरपासून महाविद्यालय सुरू, ‘या’ आहेत गाईडलाईन्स

MPSC Exam: २ जानेवारीला पूर्व परीक्षा; आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा जाहिरात प्रसिद्ध

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा