Advertisement

२० ऑक्टोबरपासून महाविद्यालय सुरू, ‘या’ आहेत गाईडलाईन्स

राज्य सरकारनं गेल्या आठवड्यात २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती.

२० ऑक्टोबरपासून महाविद्यालय सुरू, ‘या’ आहेत गाईडलाईन्स
(File Image)
SHARES

२० ऑक्टोबरपासून महाविद्यालय पुन्हा सुरू होत आहेत. मुंबई विद्यापीठानं (MU) रविवारी, १७ ऑक्टोबर रोजी, त्याच्या संलग्न महाविद्यालयांसाठी गाईडलाईन्एस (SOP) जारी केली आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील एकूण ८३७ महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत.

राज्य सरकारनं गेल्या आठवड्यात २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. जीआरमध्ये असं म्हटलं आहे की, अंतिम निर्णय विद्यापीठे आणि त्यांच्या संबंधित प्रशासकिय संस्था घेतील.

अहवालांनुसार, रविवारी मुंबई विद्यापीठानं ३ एसओपी जारी केले आहेत. एक महाविद्यालयीन अधिकारी आणि विद्यार्थ्यांसाठी, दुसरे महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि तिसरं कोविड -19 लक्षणे/पॉझिटिव्ह केसेस लक्षात घेऊन महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी उचललेल्या पावलांसाठी एसओपी जारी केले आहेत.


  • कॅफेटेरिया किंवा कॅन्टीन आणि कॉलेजच्या बाहेर किंवा आत स्टॉल बंद राहतील.
  • यासोबतच स्टेशनरी वस्तूंसाठी कॅम्पसमधील कोणतीही दुकानं खुली राहणार नाहीत.
  • शिक्षण आणि पहिल्या बाकावर बसलेल्यांमध्ये ६-८ फूट अंतर राखले पाहिजे.
  • दरम्यान, एक बेंच सोडून विद्यार्थ्यांना बसवलं जाईल. आवश्यक असल्यास, महाविद्यालय व्याख्यानं/सूचना देण्यासाठी बॅच तयार करू शकते.
  • सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना नेहमी मास्क घालावं लागेल
  • महाविद्यालयीन अधिकाऱ्यांना सामाजिक अंतर सुनिश्चित करणं, मास्क घालणं आणि इतर अनेक चरणांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी शक्य ते उपाय करण्याचे आदेश आहेत.
  • आदेशात म्हटलं आहे की, फक्त ती महाविद्यालये/कॅम्पस/शैक्षणिक संस्था उघडण्याची परवानगी आहे, जिथे संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांनी कोणतेही प्रतिबंध लादलेले नाहीत.
  • कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांसाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या वेळा वेगवेगळ्या असाव्यात.
  • महाविद्यालयीन प्राचार्यांना कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या लसीकरणाची नोंद ठेवावी लागेल, त्यांच्याकडे लसीकरण प्रमाणपत्रांच्या प्रती असतील.
  • याव्यतिरिक्त, अधिकारी आणि कर्मचारी/अभ्यागत/विद्यार्थ्यांना फोनवर आरोग्य सेतू अॅप बंधनकारक असेल.
  • कंन्टेंमेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी/कर्मचारी शारीरिक वर्गात उपस्थित राहू शकत नाहीत.
  • भौतिक आणि ऑनलाईन अध्यापनाचे एकत्रित निर्देशात्मक मॉड्यूलचे पालन केले पाहिजे.
  • जिथे शारीरिक अंतर शक्य आहे तिथे खेळांसारख्या अतिरिक्त अभ्यासक्रमांना परवानगी दिली जाऊ शकते. संपर्क खेळ टाळले पाहिजे. जिथे लागू असेल तिथे जलतरण तलाव बंद राहतील.
  • सांस्कृतिक उपक्रम टाळावेत
  • कॉलेज आणि कार्यालयीन जागा नियमित स्वच्छ करणं आवश्यक आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा