Advertisement

MPSC Exam: २ जानेवारीला पूर्व परीक्षा; आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा जाहिरात प्रसिद्ध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २ वर्ष बहुप्रतिक्षीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. मात्र, अखेर सोमवार ४ ऑक्टोबर रोजी ही जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC Exam: २ जानेवारीला पूर्व परीक्षा; आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा जाहिरात प्रसिद्ध
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २ वर्ष बहुप्रतिक्षीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. मात्र, अखेर सोमवार ४ ऑक्टोबर रोजी ही जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगामार्फत २९० पदांसाठी १६ संवर्गात भरती होणार आहे. आयोगानं ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार, येत्या २ जानेवारी २०२२ एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

याबाबतची तपशीलवार जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी व मुख्य परीक्षा दिनांक ७, ८ व ९ मे, २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ५ ऑक्टोबर दुपारी २ वाजल्यापासून अर्ज करता येणार असून, अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १२ उपजजिल्हाधिकारी, १६ पोलीस उपअधीक्षक, १६ सहकार राज्य कर आयुक्त, १५ गटविकास अधिकारी, १५ सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ, ४ उद्योग उप संचालक, २२ सहायक कामगार आयुक्त, २५ उपशिक्षणाधिकारी, ३९ कक्ष अधिकारी, ४ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, १७ सहायक गटविकास अधिकारी, १८ सहायक निबंधक सहकारी संस्था ,१५ उपअधीक्षक भूमि अभिलेख, १ उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क १ आणि ५४ सहकारी कामगार अधिकारी पदांसाठी राज्य सेवा परीक्षा २०२१ आयोजित करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा